Maharshivratri 2025: भगवान महादेवाला समर्पित असलेला महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. भगवान शिव हे हिंदू धर्मातील सर्वात जास्त पूजले जाणारे देव आहेत, ज्यांच्या महानतेचे वर्णन वेद, पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्ये देखील केले आहे. तसं पाहायला गेलं तर, प्रत्येक दिवस शिवपूजेसाठी शुभ आहे. मात्र महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वैदिक पंचागानुसार, यंदा महाशिवरात्री भद्राच्या प्रभावाखाली आहे. अशा स्थितीत भद्रा काळात महाशिवरात्रीला साजरी होत असेल, तर पूजा कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबद्दल जाणून घेऊया..
यंदा महाशिवरात्री भद्राच्या प्रभावाखाली?
महाशिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. महाशिवरात्रीचा सण म्हणजे भगवान महादेवाची आराधना आणि उपासना करण्याचा दिवस. यानिमित्ताने शिवभक्त उपवास करून भोलेनाथाची विधीवत पूजा केली जाते. या दिवशी सकाळपासूनच शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. वैदिक पंचागानुसार, यंदा महाशिवरात्री भद्राच्या प्रभावाखाली आहे. शास्त्रानुसार भद्रा अशुभ मानली जाते. आणि त्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. भद्रामध्ये शुभ कार्य केल्यास त्यात अनेक प्रकारचे अडथळे येतात. ते काम यशस्वी होत नाही. जाणून घेऊया..
महाशिवरात्री 2025 नेमकी कधी आहे?
यंदा महाशिवरात्री बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री येते. पंचांगानुसार, ही तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 पासून सुरू होईल आणि ही तारीख 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:54 पर्यंत वैध आहे.
महाशिवरात्री 2025 रोजी भद्राचं सावट?
वैदिक पंचागानुसार, यंदा महाशिवरात्रीला भद्रा काळ सुरू होतोय. त्या दिवशी सकाळी 11:08 पासून भद्रा सुरू होत आहे, म्हणजेच महाशिवरात्रीच्या चतुर्दशी तिथीसह भद्रा काळ आहे. रात्री 10.05 पर्यंत भद्रा राहील.
भद्रा काळात महाशिवरात्रीची पूजा कशी होईल?
धार्मिक मान्यतेनुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि सूर्यदेवाची मुलगी असल्याचे सांगितले जाते. ज्योतिषीनुसार भद्रा ही त्रास देणारी मानली जाते. मुहूर्तामध्ये त्याची गणना केली जाते. ब्रह्मदेव म्हणाले होते की, भद्रा काळात कोणी शुभ कार्य केले तर भद्रा अडथळे निर्माण करते. अधोलोक किंवा स्वर्गातील भद्रा अशुभ मानली जात नाही. महाशिवरात्रीला पाताळाची भद्रा आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. महाशिवरात्रीला तुम्ही तुमचे शुभ कार्य कोणत्याही भीतीशिवाय सुरू करू शकता.
देवाची पूजा करू शकता..
यंदा भद्राचा महाशिवरात्रीच्या पूजेचा संबंध आहे, भद्रा काळात कोणत्याही देवाची पूजा करू शकता. हे निषिद्ध नाही कारण ते भद्रा, राहुकाल इत्यादींच्या पलीकडे आहेत. तसेच देवांचा देव महादेव हा स्वतः महाकाल आहे, ज्यामध्ये भूत, भविष्य आणि वर्तमान समाविष्ट आहे, तो त्रिकालदर्शी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही महाशिवरात्रीची पूजा ब्रह्म मुहूर्तापासूनच करू शकता आणि ती दिवसभर होईल. शिवपूजेसाठी शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
महाशिवरात्री 2025 निशिता पूजा मुहूर्त
महाशिवरात्रीला निशिता मुहूर्तावर मंत्र सिद्धीसाठी पूजा केली जाते. महाशिवरात्रीचा निशिता पूजनाचा मुहूर्त सकाळी 12.09 ते दुपारी 12.59 पर्यंत आहे.
हेही वाचा>>>
Surya Shani Yuti: तब्बल 12 महिन्यांनी बनला सूर्य-शनीचा अद्भूत योग! 'या' 5 राशींचे भाग्य सोन्यासारखं चमकणार, नोकरीत पगारवाढ, धनवृद्धीचे संकेत?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
ब्रेकिंग तसेच ताज्या बातम्यांसाठी पाहा...