Mahadhan Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धनसंपत्तीचा कारक ग्रह शुक्र (Venus) दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. शुक्र ग्रहाला धन-वैभव, प्रेम, आकर्षण आणि विवाहाचा कारक ग्रह मानतात. त्यामुळे शुक्र ग्रहाच्या स्थितीत बदल झाल्यास त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. त्यानुसार, 2025 वर्षाच्या शेवटी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी सूर्य ग्रह मंगळ ग्रहाबरोबर संयोग करणार आहे. यामुळे शुक्र-मंगळ शुभ योग आणि सूर्यासह शुक्रादित्य योग निर्माण होणार आहे.
या व्यतिरिक्त गुरु ग्रहाची दृष्टी चौथ्या चरणात असल्यामुळे शुक्र ग्रहाबरोबर महाधन राजयोग निर्माण होणार आहे. हा राजयोग निर्माण झाल्याने काही राशींच्या लोकांचं नवीन वर्ष 2026 मध्ये भाग्य उजळेल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कन्या रास (Virgo Horoscope)
शुक्र ग्रह या राशीच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत. या ठिकाणी गुरु ग्रहाबरोबर शुक्र ग्रहाच्या दृष्टीचा देखील संबंध असेल. त्यामुळे महाधन योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. गुरु ग्रह दहाव्या स्थानी असल्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. बिझनेसमध्ये तुमचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
या राशीच्या तिसऱ्या चरणात शुक्र ग्रह असल्यामुळे तुम्हाला या काळात चांगला लाभ मिळेल. गुरु ग्रहाच्या दृष्टीने महाधन राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. नवीन नोकरीच्या संधी तुमच्यासमोर उपलब्ध झालेल्या दिसतील. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संवाद साधाल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी महाधन राजयोग फार खास असणार आहे. या काळात तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली राहील. उत्पन्नाची नवी सोधने तुमच्यासमोर खुली होतील. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता दिसून येईल. तसेच, जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)