Sankashti Chaturthi 2024: हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे (Ganesh Chaturthi) विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे. आज  संकष्ट चतुर्थी  साजरी केली जाणार आहे.या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. संकष्टीचे शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

 महाराष्ट्रासह गणरायांची ही चतुर्थी अत्यंत भक्तीभावात साजरी केली जाणार आहे. संकष्टीच्या दिवशी चंद्राची (Moon) पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संकष्टी चतुर्थी 2024 चे शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी 2024 तिथी, शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी  28 फेब्रुवाारीला  म्हणजेच बुधवारी आहे. चतुर्थी पहाटे 1.53 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवळी 29 फेब्रुवारीला पहाटे 4.18 वाजता संपणार आहे.  अशा स्थितीत उदय तिथीमुळे संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी होत आहे.

संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीला 28 फेब्रुवारीला रोजी रात्री 9.24 वाजता चंद्रोदय होईल.चतुर्थीला चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. राज्यातील  विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेगवेगळ्या असतात. 

तुमच्या शहरात चंद्रोदय कधी?

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला. 
  • त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी. 
  • सर्वप्रथम गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी 
  •  देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले व पाणी अर्पण करा.
  • त्यानंतर श्रीगणेशाला मोदक अर्पण करा. 
  • अगरबत्ती पेटवा आणि श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. 
  • उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका. 
  • संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.
  • रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)