Magh Pournima 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, महिन्यानुसार एका वर्षात एकूण 12 पौर्णिमा असतात. पौर्णिमा झाली की दुसऱ्या दिवशी नवीन महिना सुरू होतो. माघ महिन्याची पौर्णिमा  (Magh Purnima 2024) तिथीही विशेष मानली जाते, या तिथील माघी पौर्णिमा असं म्हणतात. यंदा उदय तिथीनुसार, माघी पौर्णिमा 24 फेब्रुवारीला आली आहे.


माघी पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, त्याच प्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी दानालाही अधिक महत्त्व आहे. या दिवशी देवी-देवतांचा पृथ्वीवर वास असतो, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा आलेल्या माघी पौर्णिमेची (Magh Pournima 2024) नेमकी तिथी, शुभ मुहूर्त आणि पौर्णिमेचं (Pournima) महत्त्व जाणून घेऊया.


माघ पौर्णिमा 2024 कधी आहे? (Magh Pournima 2024 Date)


पंचांगानुसार, माघ महिन्याची पौर्णिमा 23 फेब्रुवारीला दुपारी 3:36 वाजता सुरू झाली आहे आणि 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:34 वाजता संपेल. परंतु, उदय तिथीनुसार, माघ पौर्णिमा 24 फेब्रुवारीला साजरी केली जाईल.


माघ पौर्णिमा 2024 शुभ मुहूर्त (Magh Pournima 2024 Shubh Muhurta)


माघ पौर्णिमेला स्नान-दान करण्याचा शुभ मुहूर्त असतो. पंचांगानुसार, 24 फेब्रुवारीला स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 5.11 ते 6.02 पर्यंत असेल.


माघ पौर्णिमेचे महत्त्व (Magh Pournima Importance)


हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने शुभ फळ मिळतं. यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी पोहोचतात. या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता आहे.


माघ पौर्णिमा पूजा पद्धत (Magh Pournima Puja)


माघ पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर गंगास्नान करावं. गंगास्नान शक्य नसेल तर गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता. स्नानानंतर “ओम नमो नारायण” या मंत्राचा जप करावा, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन सूर्यदेवाची पूजा करावी आणि पाण्यात तीळ अर्पण करावे. त्यानंतर पूजा सुरू करून चरणामृत, पान, तीळ, मोळी, रोळी, फळे, फुलं, कुंकुम, पंचगव्य, सुपारी, दुर्वा इत्यादी भोग म्हणून अर्पण करावे. शेवटी आरती आणि प्रार्थना करा. संपत्तीची देवी माता लक्ष्मीची पूजा पौर्णिमेला करावी. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दान, दान आणि अर्घ्य द्यावे. यासोबतच या दिवशी चंद्राच्या उगमाचेही पठण करावे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा:


Shani Uday 2024 : शनी उदयामुळे वृषभसह या पाच राशींना होणार मोठा फायदा; रखडलेली कामे लागणार मार्गी, लवरकरच मिळणार प्रमोशन