Lucky Zodiac Signs 17 September 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, उद्या 17 सप्टेंबरचा दिवस आहे. हा दिवस आपल्या लाडक्या गणरायाला (Lord Ganesha) समर्पित आहे. तसेच, या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. लवकरच सूर्याचं सुद्धा संक्रमण होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) भाग्यशाली असणार आहे ते जाणून घेऊयात.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमद्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या खर्चात अचानक वाढ झालेली दिसेल. मात्र, उद्याचा दिवस तुमच्यासाठी प्रसन्नतेचा असणार आहे. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी उद्याचा दिवस सुख-शांतीचा असणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रेम संबंध चांगले राहतील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, उद्याच्या दिवसात तुमची काही महत्त्वाची कामे तुम्ही पूर्ण करु शकता. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. या दरम्यान कोणाशीही वादविवाद करु नका. तसेच, दिनश्चर्या पाळा. कामाच्या निमित्ताने तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तसेच, मित्र-मैत्रीणींबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. तसेच, शेअर बाजारात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. अचानक लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)