Shani Pratiyuti Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) देव एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. शनीचं हे संक्रमण प्रत्येक राशींच्या जीवनावर परिणाम करतं. शनीला नवग्रहांमध्ये सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानतात. तब्बल अडीच वर्ष शनी एकाच राशीत स्थित असतात. त्यामुळेच शनीचा पडणारा प्रभाव बराच काळ टिकून राहतो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की, शनि महाराज प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीना कधी शनीच्या ढैय्या, साडेसाती आणि महादशेचा सामना करावा लागतो.
वैदिक शास्त्रानुसार, 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी शनी-सूर्य ग्रह एकमेकांच्या 180 डिग्रीवर असतील. ज्यामुळे प्रतियुति योग निर्माण होणार आहे. सध्या सूर्य कन्या राशीत विराजमान आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी प्रतियुति योग फार चांगला ठरणार आहे. या राशीच्या आठव्या चरणात शनि तर सूर्य ग्रह दुसऱ्या चरणात विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला समाजात महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं दिसेल. तसेच, तुमच्या आयुष्यात सुरु असलेल्या संकटातून तुमची सुटका होईल. तुमची स्वप्न साकार होताना दिसतील. जे कार्य तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश येईल. नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. तसेच, टीम लीडर म्हणून काम कराल. व्यवसायात देखील प्रगती आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी प्रतियुति योग फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्या आयुष्यातील आनंद टिकून राहील. तुमच्या कामाचं बॉसकडून कौतुक केलं जाईल. तसेच, नोकरीत प्रगतीचे अनेक शुभ संकेत निर्माण होत आहेत. त्याचा तुम्हाला लाभ घेता येईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झालेली पाहायला मिळेल. तसेच, गुंतवणुकीतून दुप्पट लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी शनि-सूर्याचा प्रतियुति योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला समजातील विविध क्षेत्रात प्रगती पाहायला मिळेल. तुमच्या कामातून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. या राशीच्या लग्न भावात शनि स्थित आहे. त्यामुळे लवकरच लग्नाचा शुभ योग जुळून येणार आहे. दिर्घकाळापासून सुरु असलेल्या संकटातून सुटका होईल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमचं मन प्रसन्न राहील.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)