Lucky Zodiac Signs: तसं पाहायला गेलं तर प्रत्येक दिवस हा खास असतो. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार, जर ग्रहांची अनुकूल स्थिती आणि नशीबाची साथ असेल तर यश तुमच्या पायाशी असतं, तुमच्या प्रत्येक इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या नियोजित वेळी संक्रमण करतो. अशात सप्टेंबर महिना हा विशेष असणार आहे. 15 सप्टेंबर रोजी 2 महत्त्वाचे ग्रह आपली हालचाल बदलतील. हे संक्रमण पितृपक्षाच्या नवव्या दिवशी होईल. हा दिवस 4 राशींसाठी विशेष मानला जात आहे.
15 सप्टेंबर हा 5 राशींसाठी एक अतिशय विशेष दिवस
ज्योतिषशास्त्रानुसार, 15 सप्टेंबर हा एक अतिशय विशेष दिवस आहे. या दिवशी 2 मोठे ग्रह आपली हालचाल बदलणार आहेत. योगायोगाने, बुध आणि शुक्र या दिवशी आपली राशी बदलणार आहेत. बुध हा वाणी, बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, व्यवसाय, गणित, शिक्षणाचा कारक मानला जातो. 15 सप्टेंबर रोजी बुध ग्रह आपली राशी बदलेल. या दिवशी बुध कन्या राशीत संक्रमण करेल. हे संक्रमण सोमवार, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11:10 वाजता होईल.
2 मोठ्या ग्रहांचं संक्रमण
यासोबतच, सोमवार, 15 सप्टेंबर रोजी आणखी एक ग्रह आपली हालचाल बदलणार आहे. या दिवशी भौतिक सुख, वैवाहिक सुख, संपत्ती, कला, सौंदर्य यांचा कारक शुक्र हा देखील आपली राशी बदलेल. सोमवारी शुक्राचे संक्रमण सिंह राशीत होईल. हे संक्रमण रात्री 12:23 वाजता सिंह राशीत होईल. त्याचा परिणाम अनेक राशींवर दिसून येईल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, 15 सप्टेंबरनंतर सिंह राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या संक्रमणानंतर सिंह राशीच्या लोकांना भाग्य चांगले राहील आणि त्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे.
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांना या संक्रमणाचा फायदा होईल. या काळात तूळ राशीच्या लोकांना व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी, हे संक्रमण नवीन संधी आणि गुंतवणुकींपासून फायदेशीर ठरू शकते. वाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात आणि मुलांशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी, हे संक्रमण तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात
हेही वाचा :
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी सप्टेंबरचा तिसरा आठवडा नशीब पालटणारा! तुमच्यासाठी कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)