Ram Navami 2024 Baby Names : यंदा रामनवमीचा (Ram Navami) उत्सव 17 एप्रिल रोजी आहे. जर या दिवशी तुमच्या घरात तान्ह्या बाळाचं आगमन झालं असेल तर तुम्ही प्रभू श्रीरामाच्या नावावरुन बाळाचं नाव ठेवू शकता. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावावरुन होते आणि व्यक्तीचं नाव हे आयुष्यभर त्याच्यासोबत राहतं, त्यामुळे चिमुकल्यांना नावं देताना अनेक गोष्टींचा विचार करायला हवा.


जर तुमचं मूल प्रभू श्रीरामासारखं शूर आणि सत्यवान व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना खालील नावं ठेवू शकता. आज अशाच काही श्रीरामाच्या नावांची (Shri Ram Baby Names) यादी पाहूया.


प्रभू श्रीरामाच्या नावावरुन मुलांची नावं (Lord Ram Baby Boy Names)


अथर्व : चार वेदांपैकी एक 'अथर्व', भगवान रामाचं एक नाव 


अद्वैत : या नावाचा अर्थ अविश्वसनीय आहे किंवा त्याच्यासारखा कोणीही नाही, भगवान रामाचं एक नाव


अनिकृत : तुम्हाला तुमच्या मुलाचे वेगळे नाव हवे असेल आणि तुम्ही प्रभू रामाच्या नावांपैकी अनिकृत हे नाव नक्कीच आवडेल.


अबीर : प्रभू रामाच्या नावांपैकी अबीर हे एक नाव आहे.


आरुष (आरुश) : शांत आणि तेजस्वी.


अयांश : या नावाचा अर्थ देवाची देणगी असा आहे, हे रामललाचं एक नाव आहे.


अनय : अनय म्हणजे सर्वोत्तम व्यक्ती, हे भगवान रामाचं एक नाव आहे.


आदिव : आदिव नावाचा अर्थ आनंददायी आणि कोमल असा आहे, हे एक प्रभू श्रीरामांचं नाव आहे.


अन्वित : जो मैत्रीपूर्ण आहे. हे भगवान रामाचं एक नाव आहे.


अभिराम : या नावाचा अर्थ आश्चर्यकारक, सुंदर असा आहे.


विराज : सूर्यासारखा तेजस्वी, भगवान रामाचं एक नाव


मानविक : हुशार,दयाळू आणि देवावर विश्वास ठेवणारा, भगवान रामाचं एक नाव


रघुनाथ : श्री रामाला रघुनाथ असंही म्हणतात. हे नाव मुलांसाठी आहे आणि रघु हे नाव 90 च्या दशकात आणि त्यापूर्वी खूप लोकप्रिय होतं.


जनार्दन : भगवान विष्णूच्या अनेक नावांपैकी एक नाव जनार्दन आहे आणि या नावाचा अर्थ इतरांना मदत करणारा असा आहे. 


पुष्पक : भगवान विष्णुच्या पौराणिक वाहनाला पुष्पक म्हणतात, श्रीरामाच्या एका रुपाचं नाव देखील पुष्पक आहे.


कियान : या नावाचा अर्थ आहे अस्तित्व. हे प्रभू श्रीरामाचं एक नाव आहे.


राघव : अनेक लोक प्रभू रामाला राघव नावानेही हाक मारतात. ज्यांना अध्यात्मिक नावे आवडतात ते राघव नावाचा विचार करू शकतात.


दिव्यांश : देवाचा भाग, हे प्रभू श्रीरामाचं एक नाव आहे.


हेही वाचा:


Ram Navami 2024 : रामनवमीला अवघ्या 2 तास 33 मिनिटांचा शुभ मुहूर्त; संपूर्ण पूजा-विधी आणि उपाय जाणून घ्या