Libra Monthly Horoscope: तूळ राशीच्या लोकांना या महिन्यात मानसिकदृष्ट्या सक्रिय राहावे लागेल. यश मिळवण्यासाठी नियोजनाकडे लक्ष द्या. तणावापासून दूर राहून शांततेला महत्त्व द्या. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मनात संघर्षाची स्थिती निर्माण होईल. काही जण संभ्रमावस्थेतही येऊ शकतात. तुम्हाला यश मिळेल यात शंका नाही. याकाळात कर्जापासून दूर राहावे लागेल. कारण, जास्त कर्ज घेणे किंवा अनावश्यक कर्ज घेणे या महिन्यात चांगले ठरणार नाही, परंतु तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी कर्ज घेण्याची योजना करू शकता. या नवरात्रीत कन्यापूजनाला मुलींना लज्जतदार आणि गोड पदार्थ द्या. तसेच, मुलींना त्यांच्या आवडत्या भेटवस्तू आणून त्यांचे मन रमवण्याचा प्रयत्न करा.


आर्थिक आणि करिअर : या वेळी नोकरी शोधणाऱ्यांनी आता तयार राहा. ज्यांची नोकरीची मुलाखत आहे किंवा पहिल्या नोकरीत रुजू होणार आहेत, त्यांना खडतर आव्हानांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला ऑफिसमध्ये एखाद्या ट्रेनिंगसाठी पाठवले जात असेल किंवा बाहेर कुठेतरी शिकण्याची संधी मिळाली असेल, तर लगेच जा कारण या महिन्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येणार आहे. लहान असो किंवा मोठं नवीन काहीतरी नक्कीच शिकायला मिळेल. व्यवसायात नाविन्य आणण्याची हीचं वेळ आहे आणि तुम्ही सध्या करत असलेल्या व्यवसायाची दुसरी शाखा उघडून व्यवसायाचा विस्तार करणे देखील शक्य आहे. किरकोळ व्यापार्‍यांमध्ये प्राइज वॉर होऊ शकतो, अशा परिस्थितीत जर तुम्ही किमतीत थोडी वाढ केली, तर समोरची व्यक्ती त्यांच्या वस्तू स्वस्तात देऊन ग्राहकांना आकर्षित करेल.


आरोग्य : आरोग्याबाबत जागरूक राहा. खूप जड अन्न आणि तेलकट अन्ना यामुळे तुमचे पोट जड होऊ शकते आणि फुगू शकते. यकृताच्या समस्या असणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या आहारावर संयम ठेवणे आवश्यक आहे. या महिन्याच्या मधल्या काळात खिचडी-सलाद, फळासारख्या हलक्या अन्नाला महत्त्व द्या. ऋतूतील बदल पाहता, जर लस्सी आणि मठ्ठा यांचे अधिक सेवन करा. त्यामुळे पोटाचे संतुलन ठीक राहते. शारीरिक थकवा येऊ शकतो. घराबाहेर पडताना डोके झाकुनच बाहेर पडा. रोगप्रतिकारक शक्ती थोडीशी कमकुवत होईल, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल.


कुटुंब आणि समाज : या महिन्यात मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. जसे की, मुलं अभ्यास करत आहे की नाही आणि मैदानी खेळ खेळण्यासाठी पुरेसा वेळ द्या. मुलांचे संस्कार आणि सवयी जपायला हव्यात. लहान भाऊ-बहिणी कोणताही कोर्स वगैरे करण्याचा मूड बनवत असतील, तर त्यांना प्रोत्साहन द्या. जर, घरातील वातावरण खराब असेल, तर तुम्हाला शांत राहून गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हालाही राग आला, तर परिस्थितीही बिघडेल. जे लोक मुलांसाठी चांगले विवाहस्थळ शोधत आहेत, त्यांना या महिन्यात चांगली माहिती मिळण्याची शक्यता आहे. कन्याभोज संपूर्ण कुटुंबासह आयोजित केला पाहिजे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha