Libra Horoscope Today 29th March 2023 : नोकरीत प्रगतीची संधी मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा; तूळ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Libra Horoscope Today 29th March 2023 : तूळ राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर संभाषण करु शकता.

Continues below advertisement

Libra Horoscope Today 29th March 2023 तूळ राशीच्या (Libra Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या. आज तुमच्या एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होऊ शकतो. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. जवळच्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा असेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार (Employees) लोक आनंदी दिसतील. मात्र, अवाढव्य खर्च करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. आईचा सहवास तुम्हाला मिळेल. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे चरणस्पर्श करुन त्यांचे आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कामे पूर्ण होतील. तुमचा दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो. 

Continues below advertisement

आत्मविश्वासाने परिपूर्ण असा आजचा दिवस 

तूळ राशीचे (Libra Horoscope) लोक आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही महत्त्वाच्या विषयावर संभाषण करु शकता. आज कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडा. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करु शकता. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. रखडलेले पैसे देखील तुम्हाला मिळतील ज्यामुळे तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करु होतील. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. आज तुमच्या मुलांना थोडा वेळ द्या आणि त्यांचे मनोबल वाढवा. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना भेट दया. धार्मिक गोष्टीत उत्साह वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या.

आजचे तूळ राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, परंतु तुमच्या आरोग्याबाबत मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

तूळ राशीसाठी आजचे उपाय 

रामरक्षा स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 29th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून थोडे सावध राहावे; जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola