Libra Horoscope Today 19 April 2023 : आज तूळ राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे पद आणि अधिकार वाढतील. आज तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सरप्राईझ भेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे योग्य निराकरण न झाल्याने ते अस्वस्थ राहतील. वडिलांचे सहकार्य आज लाभदायक ठरेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील. न्यायालयीन खटले आज तुमच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे. आज तुमची धार्मिक कार्यात रुची वाढेल, तसेच तुम्ही धार्मिक कार्यात भाग घ्याल. 

Continues below advertisement


बोलण्यात गोडवा ठेवा


तूळ राशीच्या लोकांना आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. त्यामुळे बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल अन्यथा घरात वाद होऊ शकतो. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आज तुम्हाला उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांच्या तुलनेने चांगला आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. भविष्याकरता आत्तापासूनच पैसे जमा करण्याचा विचार करा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. तसेच, आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. 


शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल


आज कुटुंबातील आणखी काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. तसेच जोडीदाराचं सहकार्य मिळेल.


तूळ राशीसाठी आजचे उपाय


वादविवादापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या. 11 परिक्रमा करून हनुमान चालीसाचं पठण करा आणि हनुमान मंत्रांचा जप करा.


आज तूळ राशीचे आरोग्य


आज तुमचा कोणताही दीर्घकालीन आजार तुमच्या शरीरात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, तूळ राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Horoscope Today 19 April 2023 : आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य