Leo Horoscope Today 8 April 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याची चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. जे आपल्या कुटुंबीयांपासून दूर शिक्षण घेत आहेत, ते आज आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येतील. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल
तुम्हाला तुमच्या मुलांकडून आदर मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. आजूबाजूला होणाऱ्या वादात अडकू नका. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
राजकीय क्षेत्रात अधिकार गाजवाल. मित्र-परिवाराकडून आलेले प्रस्ताव स्वीकारा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृती स्वस्थ्याची विशेष काळजी घ्या. कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल. तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते.
आज कौटुंबिक वातावरण खूप आनंददायी असेल. आज कुटुंबातील सर्व सदस्य कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांचे संबंध सुधारण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. काही जुन्या गोष्टींवर कुटुंबात तणावाची परिस्थिती उद्भवू शकते. तर, काही कारणास्तव कुटुंबातील सदस्यांमध्ये वादही होऊ शकतो. तुमची भाषा आणि वाणीची काळजी घ्या. वाणीत गोडवा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
आज सिंह राशीचे आरोग्य
जास्त काम आणि धावपळ यामुळे पाय दुखू शकतात आणि पायांना सूज येऊ शकते. सध्या जास्त काम करणे टाळा आणि विश्रांती घ्या.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ टाकून तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे तुमचे आरोग्य नीट राहील.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :