Leo Horoscope Today 6 May 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. खर्च वाढतच जातील, पण तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही सर्व खर्च सहज भागवू शकाल. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. पैशाचे व्यवहार करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते. छोट्या व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. जे घरापासून दूर काम करत आहेत ते त्यांच्या कुटुंबियांना भेटायला येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत मिळून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.
प्रयत्नांना यश मिळणार
सिंह राशीच्या लोकांना आज शत्रूंवर विजय मिळवता येईल. सकारात्मक विचार केला तर जीवनात पुढे जाण्याची दिशा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. जास्त मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा, अन्यथा डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, अन्यथा दुखापत होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार असून, उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी निर्माण होताना दिसत आहेत. नोकरदार वर्गाला कामातील ताणतणाव कमी होतील. आर्थिक बाबतीत कोणाकडून उधारी घेणं टाळा. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात आज वाढ होईल.
आजचे सिंह राशीचे आरोग्य
आज तुम्हाला त्वचेची अॅलर्जी किंवा खाज येण्याची समस्या भासू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
भगवान शिवाची पूजा करा आणि गंगेच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून अर्पण करा. शिव चालिसाचं पठण करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :