Leo Horoscope Today 23rd March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही खूप उत्साही असाल. कामातही तुमचा वेग जाणवेल. अतिरिक्त पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जाऊ शकतात. घरात एकोपा राखण्यासाठी एकत्र काम करा. तुम्ही करत असलेल्या कामात घरच्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल. घरामध्ये पूजा, पाठ इत्यादींचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये सर्व परिचित, नातेवाईकांचे येणे-जाणे चालू राहील. सर्व लोक एकत्र धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील, जिथे सर्व लोक खूप आनंदी दिसतील. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम करताना दिसतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. कोणत्याही कामाला जाताना घरातील ज्येष्ठांचा आशिर्वाद घ्या.  


कुटुंबाचं सहकार्य मिळेल


आज एकंदरीतच सिंह राशीचे कौटुंबिक वातावरण प्रसन्न असेल. घरात पाहुण्यांची ये-जा सुरु असेल. तुम्ही करत असलेल्या कामात घरच्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तुमचं कुटुंबच तुमचा आधार आहे. तुमच्या गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुमच्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसू शकतात. जे लोक कामानिमित्त आपल्या कुटुंबापासून लांब राहतायत आज त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. लवकरच त्यांना भेटण्याचा योग देखील येऊ शकतो.


आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. राजकीय क्षेत्रातील तुचं व्यक्तिमत्त्व खुलेल. मित्र-मैत्रीणींशी मोकळेपणाने संवाद साधा. आरोग्य चांगले राहील. 


आजचे सिंह राशीचे आरोग्य 


पाठदुखीची तक्रार भासू शकते आणि त्यामुळे तुमच्या कार्यालयीन कामावरही परिणाम होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचं जड वजन उचलणं टाळा. विश्रांती घ्या. 


सिंह राशीसाठी आजचे उपाय 


आज भगवान विष्णूची पूजा करा आणि तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. मनापासून पूजा करा.


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Horoscope Today 23rd March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या