Leo Horoscope Today 22 June 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळतील. नोकरदार (Employees) लोकांना नवीन नोकरीची (Job) ऑफर मिळेल. छोटे व्यापारी त्यांच्या व्यवसायात देखील नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या मालमत्तेतून चांगला नफा मिळेल. जर तुम्ही आधी गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घरात सुरू असलेली कायदेशीर कामे संपतील आणि सुख-शांती राहील. आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. आज तुम्हाला जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत थांबलेली कामे पूर्ण होतील. तुमचे आरोग्य ठीक राहील, पण पोटाच्या आजारामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल.
सिंह राशीच्या लोक आज मुलांच्या भविष्यासाठी काही नियोजन करू शकता. आज तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही तुमच्या मनातील गोष्ट सांगू नका. अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला यामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नोकरीच्या क्षेत्रात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल. संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना आज सन्मान मिळेल. आज सासरच्या मंडळींकडूनही धनलाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. व्यवसायाच्या संदर्भात काही जवळचे आणि दूरचे प्रवास देखील करावे लागतील, यामध्ये तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.
सिंह राशीचे आजचे आरोग्य
आज पाठदुखीच्या तक्रारी भासू शकतात आणि यासाठी भुजंग आसन केल्याने तुम्हाला फायदा होईल. व्यायामासाठीही वेळ काढा.
सिंह राशीसाठी आजचे उपाय
आज श्री गणेशाची मनोभावे पूजा करा आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करा.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :