Laxmi Pujan Shub Muhurat 2024 Time : दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. यंदा दिवाळी (Diwali 2024) चार दिवसांची आहे. हिंदू धर्मात, या चारही दिवसांचं वेगळं असं महत्त्व आहे. त्यानुसार आजचा दिवस लक्ष्मीपूजनाचा आहे. अश्विन अमावस्येनुसार आज म्हणजेच 01 नोव्हेंबर रोजी जगभरात लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जातोय. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा लक्ष्मीपूजनाचे एक, दोन नव्हे तर तब्बल तीन मुहूर्त आहे. हे मुहूर्त नेमके कोणते ते पाहूयात. 


दिवाळीला शास्त्राचं महत्त्व नेमकं काय? दीपावलीचे महत्त्व नेमके काय आहे आणि कशा पद्धतीने दीपावली साजरी केली पाहिजे? याविषयी प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात...


**मोहन दाते सर:** नमस्कार. आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. अश्विन अमावस्या आज शुक्रवारी असून सूर्योदयापासून काळपर्यंत असलेल्या अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करावयाचे असते. त्यामुळे आज 1 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी आपल्याला लक्ष्मी पूजनासाठी मुहूर्त जे आहेत ते म्हणजे सायंकाळी 3 ते 5 वाजून 15 मिनिटे पर्यंत किंवा प्रदोष मुख्य काळ सांगितलेला आहे संध्याकाळी 6 ते 8.30 किंवा रात्री 9 वाजून 10 ते 10 वाजून 35 मिनिटे या तीन मुहूर्तांमध्ये आपण आपल्या सोयीने कोणत्या वेळी लक्ष्मी पूजन करू शकता. 


"आज शेवटी लक्ष्मी हे सगळ्यात प्रत्येकाला जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या लक्ष्मीचे पूजन करत असताना जी लक्ष्मी माता आहे त्या प्रतिमेचे किंवा त्या मूर्तीचे पूजन करणे, जे आपण चलनामध्ये जे वापरतो जी संपत्ती वापरतो त्या संपत्तीचे पूजन करायचे आहे आणि जे अलंकार स्वरूपी जी संपत्ती आहे त्याचे पूजन आज करायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी ऐश्वर्य, संपत्ती आणि श्री यांचं प्रतीक असलेल्या लक्ष्मीचे पूजन हे प्रत्येकाच्या घरोघरी केलं जातं आणि यालाच दीपावलीचा मुख्य सण म्हटलं जातं. म्हणून हा लक्ष्मीचा जो उत्सव आहे, सण आहे, पूजा आहे ती आपण संध्याकाळी विधीवत करावी. विशेष करून या दिवशी धणे, लाह्या, बत्तासे हेही लक्ष्मीला अर्पण केले जातात. त्या पाठीमागे काही वेगळा विचार ऋतूंचा आहे आणि हा सगळा विचार करत असताना आपण मनोभावी या लक्ष्मीचे जर का पूजन केलं तर सगळेजण सुखी होतात. आरोग्यम धनसंपदा असेही म्हटलं आहे. तेव्हा आरोग्यही आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि म्हणून लक्ष्मीचे पूजन करून हा दिवाळीचा उत्सव आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा." 


दिवाळी सणाचं महत्त्व 


या वर्षी पाऊस पाणी खूप छान झालेला आहे. सगळे लोक आनंदामध्ये आहेत. तेव्हा सर्वांना या दीपावलीच्या दाते पंचांगतर्फे अनंत शुभेच्छा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापाऱ्यांचे एक वर्ष बदलत आणि विक्रम संवत बदलत आणि म्हणून बदलणारा हा दिवस जो आहे तो दिवाळी पाडव्याचा आहे. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे आणि म्हणून या व्यापारी लोक विशेषत: या पाडव्याला दुकानाचे आपल्या वहीचे नवीन खाते वहीचे पूजन करत असतात आणि ते पूजन दिवाळीच्या पाडव्याला आपण पहाटे सकाळी आपल्या सोयीने दिवसभरात कधीही करू शकतो. आणि त्यानंतर जोडून येणारा सण म्हणजे भाऊबीज. त्या पाठीमागे भाऊ आणि बहीण यांचे जे प्रेमाचा संबंध आहे, बहीण हे सासरी गेलेली असते त्या निमित्ताने तिच्याकडे भाऊ जातो किंवा ती भावाकडे येते आणि एकमेकांचा स्नेह संबंध असतो तो वृद्धिंगत होतो आणि म्हणून भाऊबीज हा सुद्धा सण आपण बहिणीकडून औक्षण करून घेऊन आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. अशी दिवाळी खरंतर सहा दिवसांची आपण मानली पाहिजे, वसुबारसे बसून भाऊबीजपर्यंत हा जो सहा दिवसांचा दिवाळीचा उत्सव आहे तो संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य राखण्यासाठी आहे, सगळे नाते संबंध जपण्यासाठी आहे. 


लक्ष्मीपूजनाचे तीन शुभ मुहूर्त (Laxmi Pujan Shub Muhurat 2024)


लक्ष्मीपूजनासाठी प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त नेमका कोणता असणार आहे याबाबत माहिती दिली आहे.  


1. दुपारी 03.00 ते 05.05 


2. सायंकाळी 06 ते 08.30


3. रात्री 09.10 ते 10.50 यापैकी कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मीपूजन करु शकता. 


पाहा व्हिडीओ : 



हे ही वाचा :


Diwali 2024 : आज लक्ष्मीपूजन; जाणून घ्या अचूक तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी