Ketu Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केतू (Ketu) आणि राहू हे दोघेही छाया ग्रह आहेत. भारतीय ज्योतिषशास्त्रात त्यांना खूप महत्त्व दिलं जातं. अनेकदा राहूचं भ्रमण (transit) चर्चेत येतं, पण केतूचं महत्त्व देखील काही कमी नाही. या ठिकाणी आपण केतूचा प्रभाव काय असतो आणि केतूच्या संक्रमणाने कोणत्या राशी लाभदायक ठरतील ते जाणून घेऊयात.
केतूचा प्रभाव काय असतो?
केतू हा मोक्ष, आध्यात्मिकता, त्याग, अंतर्मुखता, आणि गूढतेचा ग्रह मानला जातो. त्याचे परिणाम हे त्या व्यक्तीच्या पत्रिकेतील स्थान, त्याच्या राशी, आणि ग्रहयोगांवर अवलंबून असतात.
केतूच्या भ्रमणाचे सामान्य परिणाम :
1. मानसिक अवस्था : अंतर्मुखता वाढू शकते. व्यक्ती विचारमग्न होते, अध्यात्मिकतेकडे वळते.
2. नोकरी/कार्यक्षेत्र : असमाधान वाटू शकते, स्वतःची ओळख शोधण्याचा काळ असतो.
3.आरोग्य : त्वचा, मेंदू, नसा, किंवा अज्ञात आजारांशी संबंधित त्रास संभवतो.
4. संबंध : गोंधळ, गैरसमज, वियोगाची शक्यता. जुन्या संबंधांपासून मन दूर जाऊ शकतं.
5. अध्यात्म : ध्यान, योग, साधना यासाठी उत्तम काळ असतो.
केतू गोचराचा लाभ होणाऱ्या राशी :
1. मेष रास (Aries Horoscope)
- केतूच्या गोचरामुळे अचानक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, आणि कौटुंबिक सौहार्द मिळू शकते.
- कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल.
2. मिथुन रास(Gemini Horoscope)
- केतू तिसऱ्या भावात येत असल्याने आत्मविश्वास वाढेल, नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात, आणि बंधु-भगिनींचा पाठिंबा मिळेल.
- नवीन नोकरीच्या संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
3. धनु रास (Sagittarius Horoscope)
- केतू नवव्या भावात असल्याने भाग्यवृद्धी, अध्यात्मिक प्रगती, आणि धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
- विदेश प्रवासाचे योग आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल संभवतात.
4. मकर रास (Capricorn Horoscope)
- केतू अष्टम भावात असूनही, आध्यात्मिक प्रगती, मानसिक शांतता, आणि आर्थिक स्थिरता मिळू शकते.
- धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे.
- डॉ भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)