Karwa Chauth 2023: करवा चौथचा (Karwa Chauth) दिवस विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास करतात. यावेळी 1 नोव्हेंबरला, म्हणजेच आज करवा चौथ साजरा केला जात आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी करवा चौथचा उपवास केला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते.


अविवाहित मुली करवा चौथचं व्रत ठेवू शकतात का?


करवा चौथ व्रत विशेषतः विवाहित महिलांसाठी आहे. पण कुमारिकांनाही हे व्रत करता येईल का? असा प्रश्न अनेकांना पडतो. अविवाहित मुली किंवा ज्यांचं लवकरच लग्न होणार आहे, अशा मुली देखील करवा चौथचं व्रत ठेवू शकतात. या दिवशी उपवास ठेवू शकतात. पण अविवाहित मुली हा उपवास करत असतील तर त्यांना तारे पाहून हा उपवास सोडावा लागतो.


चंद्राऐवजी ताऱ्यांना अर्घ्य देवून सोडावा लागेल उपवास


मुलीचे लग्न होईपर्यंत तिला तारे बघून उपवास सोडावा लागतो. जर अविवाहित मुलींनी करवा चौथच्या दिवशी करवा चौथ उपवास केला तर त्या ताऱ्यांना अर्घ्य देऊन उपवास सोडू शकतात. असं मानलं जातं की केवळ विवाहित महिलाच चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडू शकतात. अविवाहित मुली चंद्राला पाहून उपवास सोडत नाहीत.


करवा चौथच्या दिवशी अविवाहित मुली अनेकदा त्यांचा प्रियकर किंवा भावी जोडीदारासाठी किंवा ज्याच्याशी लग्न ठरलं आहे त्याच्यासाठी उपवास करतात. बर्‍याच वेळा अविवाहित मुली चांगल्या जोडीदारासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात आणि ताऱ्यांना अर्घ्य देऊन उपवास सोडतात.


अविवाहित मुलींसाठी नियम (Karwa Chauth Vrat Rules For Unmarried Girls)



  • जर अविवाहित मुलींनी या दिवशी उपवास केला असेल तर त्यांनी हातावर मेहंदी लावावी.

  • या दिवशी काहीही न खाता किंवा न पिता हे व्रत ठेवा.

  • कुमारिकांनी लाल रंगाचे कपडे घालणं आवश्यक नाही, ते काळा आणि पांढरा वगळता कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकतात.

  • अविवाहित मुलींना सकाळी सरगी खाणं बंधनकारक नाही.

  • या दिवशी अविवाहित मुली शिव-पार्वतीची पूजा करू शकतात.


(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Kartik Month 2023: सुरू असलेल्या कार्तिक महिन्यात तुळशीला अधिक महत्त्व; रोज तुळशीपूजनाने मिळतील 'हे' लाभ, जाणून घ्या