Jyeshtha Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र पाहायला मिळतो. धार्मिक मान्यतेनुसार, हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या (Jyeshtha Purnima 2024) दिवशी गंगास्नान करणं, सत्यनारायण कथा वाचन, दान करणं हे फार शुभ मानलं जातं. या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेराची (Kuber) पूजा करून व्रत पाळल्यास शुभ फळ मिळतं. या दिवशी संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर चंद्राला अर्घ्य दिलं जातं.
यंदा ज्येष्ठ पौर्णिमा 22 जूनला शनिवारी आहे. या दिवशी अनेक शुभ योग घडत आहेत, ज्याचा थेट लाभ 3 राशींवर दिसून येईल. या राशींना लक्ष्मी-कुबेराच्या आशीर्वादाने अनेक लाभ मिळतील. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीला 22 जूनला येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेचा थेट लाभ मिळेल. जर या राशीचे लोक कोणत्याही मानसिक चिंतेने त्रस्त असतील तर त्यांची लवकरच सुटका होऊ शकते. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होण्यास मदत होईल. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही समस्या येत असतील तर त्याही दूर होतील आणि तुम्हाला व्यवसायात नफाही मिळेल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीला ज्येष्ठ पौर्णिमा शुभ लाभ देणार आहे. वडिलोपार्जित वाद दीर्घकाळ चालत असतील तर या काळात त्यातूनही तुम्हाला आराम मिळेल. शक्य असल्यास परदेशातही प्रवास करण्याची संधी मिळेल. संपत्ती वाढवण्याचे नवे मार्ग मिळतील. या दिवशी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊ शकता. जोडीदारासोबतचं नातं अधिक घट्ट होईल.
धनु रास (Sagittarius)
या राशीसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. शक्य असल्यास, तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. एखादं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आता पूर्ण होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :