Jyeshta Month 2022 : ज्येष्ठ महिना भगवान विष्णूच्या आवडत्या महिन्यापैकी एक आहे. ज्येष्ठ शुक्लासंदर्भात शास्त्रात सांगितले आहे. आजपासून म्हणजेच 31 मे 2022 मंगळवारपासून ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. ज्येष्ठ शुक्लमध्ये लक्ष्मीची कृपा कशी मिळवावी आणि कोणती कामे करू नयेत ते जाणून घेऊया. 



ज्येष्ठ महिना कधी संपतो?  
पंचांगानुसार 17 मे 2022 रोजी ज्येष्ठ महिना सुरू झाला. 14 जून 2022 रोजी ज्येष्ठ महिना संपणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्ष आजपासून सुरू झाला आहे. 


ज्येष्ठ शुक्ल पक्षाचे प्रमुख व्रत आणि सण  
03 जून, शुक्रवार: विनायक चतुर्थी (विनायक चतुर्थी 2022)
07 जुलै, गुरुवार: मासिक दुर्गाष्टमी व्रत (दुर्गा अष्टमी 2022)
09 जून, गुरुवार: गंगा दसरा (गंगा दसरा 2022 तारीख)
10 जून, शुक्रवार: निर्जला एकादशी (निर्जला एकादशी 2022)
१२ जून, रविवार: प्रदोष व्रत (प्रदोष व्रत 2022)
14 जून, मंगळवार: ज्येष्ठ पौर्णिमा व्रत, वट पौर्णिमा व्रत (वट पौर्णिमा 2022)


ज्येष्ठ महिन्यात लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व 
ज्येष्ठ मासात लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शुक्ल पक्षातील शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. ज्या लोकांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित कोणतीही समस्या आहे अशा लोकांनी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात लक्ष्मीची पूजा केल्याने उत्तम फळ मिळते. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी शुक्रवारी येत आहे.  या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. सर्व एकादशी व्रतांपैकी हा सर्वात कठीण व्रत मानला जातो. नियमितपणे हे व्रत केल्यास भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.


लक्ष्मीचा कोप होतो
ज्येष्ठ महिन्यात लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर चुकूनही या पाच गोषी करायला विसरू नका.  


स्वच्छता : लक्ष्मीला स्वच्छता अधिक प्रिय आहे. त्यामुळे घाणीपासून दूर राहा. घर स्वच्छ ठेवा, स्वच्छ कपडे घाला, घरात कोळ्याचे जाळे नसावेत.


अन्नाचा आदर करा : जो व्यक्ती अन्न आणि पाण्याचा आदर करत नाही त्याला लक्ष्मी आपला आशीर्वाद देत नाही. जेवताना अन्न सांडू नये. पाण्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. ज्येष्ठ महिन्यात जल दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.


लोभ करू नका  : जे लोक लक्ष्मीचा लोभ करतात ते लोक लक्ष्मीला आवडत नाही. जे इतरांच्या संपत्तीचा लोभ करतात, लक्ष्मी त्यांना सोडून जाते.
 
राग आणि अहंकार :  लक्ष्मीला राग आणि अहंकारी लोक आवडत नाहीत. अशा लोकांना लक्ष्मी लवकर सोडते.


आळस : लक्ष्मी आळशी लोकांना आशीर्वाद देत नाही. त्यामुळे आळस सोडला पाहिजे. जे शिस्तीचे पालन करतात आणि कठोर परिश्रम करतात त्यांच्यावर लक्ष्मीची विशेष कृपा असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :