Jupiter Transit 2024 : देवगुरु गुरू 1 मे रोजी वृषभ राशीत (Taurus Horoscope) स्थित असून वर्षभर येथे राहणार आहे. वृषभ हे दैत्य शुक्राचार्यांचे घर आहे. त्यामुळे एक गुरू दुसऱ्या गुरूच्या घरी वास्तव्य करत आहे असं म्हणायला हरकत नाही. अंतराळात अशा प्रकारे दोन गुरूंच्या भेटीचा परिणाम वेगवेगळ्या राशीच्या लोकांवर होतो. गुरु आणि विद्यार्थी (Students) यांचं नातं तर आपणा सर्वांनाच माहीत आहे. गुरूशिवाय शिष्य यशस्वी होऊ शकत नाही, उत्तम गुरूच जीवनात यश मिळवून देतो. त्याचप्रमाणे वृषभ राशीत बसलेला देवगुरू बृहस्पतीचं सर्वांवर लक्ष आहे. पण, विशेषत: चार राशीच्या विद्यार्थ्यांवर गुरुचं लक्ष आहे.

ज्याप्रमाणे गुरू द्रोणाचार्यांनी आपला शिष्य अर्जुन तयार केला, गुरु संदिपनाने श्रीकृष्णाला तयार केले, ज्याप्रमाणे विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी रामाला तयार केले, त्याचप्रमाणे आता या राशींच्या लोकांनाही आपल्या गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालावे लागेल, तरच ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी होतील. त्यांच्या ज्ञानात वाढ होऊन त्यांची चांगली प्रगती होईल. याशिवाय त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल.

या राशींना गुरू ग्रहाचा विशेष आशीर्वाद मिळेल 

मेष, मिथुन, सिंह आणि धनु राशीच्या विद्यार्थ्यांना देवगुरू गुरूचा आशीर्वाद मिळणार आहे. या लोकांना चांगले परिणाम मिळतील. त्याची स्मरणशक्ती सुधारेल. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. 

मेष रास 

मेष राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळेल. अभ्यासाच्या क्षेत्रातील अडथळे दूर होतील आणि तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. 

मिथुन रास 

मिथुन राशीचे विद्यार्थी करिअरच्या क्षेत्रात यश मिळवू शकतील. तुमची प्रगती इतकी होईल की तुमची कीर्ती सगळीकडे पसरेल. 

सिंह रास 

सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडवण्याची वेळ सुरू झाली आहे. नोट्स बनवून चांगली तयारी करा आणि नंतर तुमचा विषय शब्दशः लक्षात ठेवा. अभ्यासाच्या क्षेत्रातील आव्हानांवर मात करून गुरु तुम्हाला यशस्वी करतील. 

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी कठोर परिश्रम आणि प्रयत्न केल्यास परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसेच, जर तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन सबमिट करायचं असेल तर त्याची नीट तयारी करून घ्या. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. यश तुमचंच आहे.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Chaturgrahi Yog 2024 : 10, 20 नाही तर तब्बल 50 वर्षांनंतर बनतोय चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार चौफेर लाभ, धन-संपत्तीत होणार प्रचंड वाढ