January 2026 Monthly Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिना संपून लवकरच आता नवीन वर्ष 2026 सुरू होणार आहे, या वर्षातील पहिला महिना जानेवारी देखील लवकरच सुरु होणार आहे. 2026 वर्षाचा पहिला महिना असल्या कारणाने हा महिना कसा जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तसेच, या महिन्यात ग्रहांची स्थिती तशी शुभ मानली जातेय. या महिन्यात मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे जानेवारी 2026 चा (January 2026) महिना तूळ ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ मासिक राशीभविष्य (Libra Monthly Horoscope December 2025)
तूळ राशीसाठी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी तुम्हाला तुमच्या वागण्या-बोलण्यात संयम ठेवावा लागेल. शांत आणि संयमी दृष्टिकोनामुळे यश मिळण्याची शक्यता वाढेल. जास्त ठाम राहू नका. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात कोणतेही आश्वासन देणे टाळा.
वृश्चिक मासिक राशीभविष्य (Scorpio Monthly Horoscope December 2025)
वृश्चिक राशीसाठी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी गूड न्यूजचा असेल. काही आनंददायी घटना तुमचा मूड सुधारतील. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. कामावर मतभेद निर्माण झाल्यास, संवादाद्वारे ते सोडवण्याचा प्रयत्न करा.
धनु मासिक राशीभविष्य (Saggitarius Monthly Horoscope December 2025)
धनु राशीसाठी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी नोकरी आणि व्यवसायात सांभाळून राहा. एखादी अप्रिय घटना घडू शकते. त्याशिवाय, महिना चांगला जाईल. तुमचे विचार व्यक्त करताना काळजी घ्या. एखादी गोष्ट साध्या करण्यासाठी तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडून द्यावा लागू शकतो.
मकर रास (Capricorn December 2025 Monthly Horoscope)
मकर राशीसाठी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी थोडा सामान्य असेल. इतरांचे बोलणे मनावर न घेता काम करा, कोणतेही टेन्शन न घेता काम केले तर यश मिळेल, जर तुम्हाला वाटत असेल की इतर लोक तुमच्या कल्पनांशी असहमत आहेत, तर अहंकार न बाळगता पुढे जा.
कुंभ मासिक राशीभविष्य (Aquarius Monthly Horoscope December 2025)
कुंभ राशीसाठी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा अनुकूल ग्रहांच्या मदतीने यश मिळेल. तसेच तुम्ही सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घ्याल. महिन्याच्या पहिल्या काही दिवसांत काम चांगले आणि यशस्वी होईल. प्रगतीचा मार्ग दिसेल. नोकरीत तुम्ही एखादे नवीन पद स्वीकाराल.
मीन मासिक राशीभविष्य (Pisces Monthly Horoscope October 2025)
मीन राशीसाठी 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी व्यवहारात निष्काळजी राहू नका. रिअल इस्टेट व्यवहार पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल. तुम्ही समाजातील प्रतिष्ठित लोकांना भेटाल. अनावश्यक खर्च कमी करा आणि गुंतवणूक वाढवा.
हेही वाचा
January 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जानेवारी महिना नशीब पालटणारा! नववर्षात कोणत्या राशी होतील मालामाल? मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)