Janmanshtami 2025 Wishes : हिंदू धर्मशास्त्रानुसार, जन्माष्टमीच्या (Janmashtami) दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. पौराणिक कथेनुसार, द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यामुळे या दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळ श्रीकृष्णाच्या जन्मानंतर विधीवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

त्यानुसार, यंदा जन्माष्टमीचा उत्सव उद्या म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीण, प्रियजनांना तसेच नातेवाईकांना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकतात.

गोकुळाष्टमी शुभेच्छा संदेश (Janmanshtami 2025 Wishes)

गोकुळामध्ये होता ज्याचा वास

गोपिकांसोबत ज्याने रचला रास

यशोदा, देवकी ज्याची मैय्या

तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि

दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण

जन्माष्टमीचा शुभ

सोहळा साजरा करूया.

जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा...!

 

श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि

भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो….

तुम्हाला चांगल्या जीवनासाठी

मार्गदर्शन करण्यासाठी

भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा...!

 

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद

लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास

असा आहे आजचा दिवस खास

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

 

राधेची भक्ती, बासरीची गोडी,

लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास

मिळून साजरा करुया

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

 

पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला

ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ

तो परम प्रिय नंदलाला

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,

राम नारायणं जानकी वल्लभं,

जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

 

जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा

गोडवा घेऊन आली,

कान्हाची किमया न्यारी,

दे आम्हाला तू आशीर्वाद

गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

 

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता

ते आहेत नंदलालचे गोपाला

बासरीच्या मोहक आवाजाने सर्व

दुःख हरणारा मुरली मनोहरचा

सण गोविंदा गोपाळा

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

कृष्ण ज्याचं नाव

गोकुळ ज्याचं धाम

अशा श्री भगवान कृष्णाला

आमचा शतश: प्रणाम

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Numerology : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात 'या' जन्मतारखेचे लोक; कुंडलीत जन्मत:च असतो राजयोग; प्रत्येक क्षेत्रात असतात अव्वल