Dam Water Storage: महाराष्ट्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे .धरण क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे राज्यभरातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत आहे . जलसंपदा विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यभरातील लघु मध्यम व मोठ्या धरणांमध्ये 74.50% उपयुक्त पाणीसाठा झालाय . अनेक धरणे फुल्ल झाली आहेत .अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे . पाहूया कुठे काय परिस्थिती ?

भंडाऱ्यात गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत .धरणातून 79,394 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे . भंडाऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे .

राज्यात कोणत्या विभागात किती पाणी ?

नागपूर विभाग : 66 .02%अमरावती विभागः 70.26%मराठवाडा विभाग : 63.07%नाशिक विभागः 67.89%पुणे विभाग : 83.33%कोकण विभागः 86.19%

कुठे किती पाणीसाठा ?

महाराष्ट्रातील लघु मध्यम मोठ्या सर्व धरणांमध्ये 74.50% उपयुक्त पाण्यासाठी नोंद करण्यात आली आहे . विदर्भात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार व अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली . नागपूर विभागात मोठ्या 16 धरणांमध्ये 64.40% पाणीसाठा आहे . यात वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यातील धरणांचा समावेश आहे .अमरावती विभागात सरासरी उपयुक्त पाण्यासाठी 74.55 टक्क्यांवर आहे .

गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळं वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी, गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यानं तो नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहे. धरणातून सध्या 79 हजार 394 वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आज पावसानं उसंत घेतल्यानं धरणातून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात येणार असल्याची माहिती गोसीखुर्द धरण प्रशासनानं दिली आहे.

मराठवाड्यात कुठल्या धरणात किती ?

छत्रपती संभाजी नगरच्या जायकवाडी धरणात 91.88% उपयुक्त पाणीसाठा आहे .हिंगोली चे सिद्धेश्वर धरण 81.63% भरले आहे . तर येलदरी मध्ये 92.84% पाणीसाठा झालाय .नांदेडच्या विष्णुपुरी धरणात 86.53% जलसाठा आहे . धाराशिवच्या निम्नतेरणात 80.66% तर सीना कोळेगाव व प्रकल्पात 66.71% पाणीसाठा झालाय . परभणीत निम्न दुधना 63.53 टक्क्यांनी भरले आहे .

पुण्यात कुठल्या धरणात किती पाणीसाठा ?

पुण्याच्या भाटघर धरणात 98.44% पाणी असून पवना धरण 82.99% भरले आहे .खडकवासला धरणात 48.46 तर पानशेत धरण 89.98% भरले आहे . सांगलीतील वारणा धरण 81% आहे .साताऱ्यातील कोयना धरणात 82.88% सोलापुरातील उजनी धरण 100% भरले आहे .कोल्हापुरातील दूधगंगा ८०.६४% तर राधानगरी धरण 93.18% भरले आहे .राज्यभरात यंदा पावसाळ्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने धरण साठ्यात वाढ झाली आहे .