Jagannath Rath Yatra 2025 : ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या भव्य रथयात्रेची सुरुवात 27 जूनपासून सुरु झाली. अनेक वर्षांनुवर्ष ही परंपरा या ठिकाणी चालत आलेली आहे. जगन्नाथ मंदिर, पुरी (ओडिशा) हे भारतातील एक अत्यंत पवित्र आणि रहस्यमय मंदिर आहे. या मंदिरातील अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत. त्यातलीच एक परंपरा म्हणजे मंदिरात प्रवेश करताना भाविक “तिसऱ्या पायरीवर पाय ठेवत नाहीत”. यामागे नेमकं कारण काय? याच संदर्भात ज्योतिषशास्त्र डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती सांगितली आहे. 

Continues below advertisement


यामागील धार्मिक कारण :


जगन्नाथ पुरी मंदिरातील तिसरी पायरी ही “अनंत वासुदेव” यांचे स्थान मानली जाते. असं मानलं जातं की तिसऱ्या पायरीवर स्वतः भगवान विष्णू (जगन्नाथांचा स्वरूप) यांनी स्थान घेतलं आहे. त्या पायरीवर पाय ठेवणं म्हणजे भगवंतावर पाय ठेवण्यासारखं समजलं जातं. या श्रद्धेमुळे, भक्त तिसरी पायरी गाळून दुसरी किंवा चौथी पायरीवरून उडी मारून मंदिरात प्रवेश करतात.


या परंपरेचा आध्यात्मिक अर्थ :


विनयभाव : भगवंताच्या सान्निध्यात प्रवेश करताना नम्रता आणि श्रद्धा ठेवणे.
आध्यात्मिक जागृती : ही परंपरा आपल्याला आपला अहंकार विसरून, भगवंताच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी प्रेरित करते.
पवित्रतेचा संकेत : काही जागा ही शुद्ध ऊर्जेने परिपूर्ण असते, जिथे केवळ पाय नव्हे तर मन देखील स्वच्छ असावे लागते.


भक्त काय करतात?


तिसरी पायरी न गाळता तिथे नतमस्तक होतात (नमस्कार करतात),आणि मग पुढे जातात.
काही भक्त पाय न ठेवता हात लावून कपाळाला लावतात.
देवा वर पाय पडला तर नरकात जाऊ अशी मान्यता या भक्तांच्या मनात असते. 


हे ही वाचा : 


Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांमध्ये असते भविष्य पाहण्याची क्षमता; सिक्स सेन्स असतो खूपच स्ट्रॉंग, 90 टक्के सल्ले ठरतात खरे


- डॉ. भूषण ज्योतिर्विद