Numerology Of Mulank 7 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक (Mulank) हा त्याच्या स्वभाव, विचार आणि क्षमतेशी संबंधित आहे. अंकशास्त्रानुसार, अंकशास्त्रात (Ank Shastra) सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीचा स्वभाव, त्यांची आवड-निवड कळते. याच्या माध्यमातून व्यक्तीचं लक्षण, चरित्र, नातेसंबंध आणि करिअरच्या बाबतीत माहिती मिळते. आज आपण मूलांक 7 चं व्यक्तिमत्व कसं असतं हे जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.
अंकज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 7 च्या लोकांमध्ये अंतर्ज्ञानाची एक विशेष अद्भूत शक्ती असते. हे लोक अनेकदा काही कारण नसताना असे काही निर्णय घेतात ते नंतर अगदी खरे ठरतात. असं म्हणतात की, या जन्मतारखेच्या लोकांमध्ये भविष्य बघण्याची विशेष शक्ती असते. केव्हा कधी आणि काय होईल याचा त्यांना आधीच अंदाज लागतो.
केतूचा असतो विशेष प्रभाव
अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांवर केतू ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. केतू ग्रह हा रहस्य, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक मानलं जातं.
भविष्याला पाहण्याची शक्ती
केतू ग्रहाचा संबंध अदृश्य शक्ती आणि भविष्यातील गंभीरतेशी जोडण्यात आला आहे. याच कारणामुळे मूलांक 7 असणारे लोक अनेकदा या सगळ्या गोष्टी अनुभवतात ज्याचा बाकी कोणी अंदाजही लावू शकत नाहीत.
सिक्स सेन्स असतो सक्रिय
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा सिक्स सेन्स नेहमीच अतिशय तीव्र असतो. हे लोक कोणत्याही व्यक्तीला किंवा परिस्थितीला पाहून त्यांच्याविषयी अंदाज लावण्यात फार तरबेज असतात. यांना अनेकदा भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो.
फार गंभीर आणि शांत स्वभावाचे असतात
मूलांक 7 असणारे लोक फार गंभीर, विचारशील आणि अंतर्मुखी स्वभावाचे असतात. हे लोक जास्त बोलण्याकडे नाही तर गोष्टी समजून घेण्यात जास्त इंटरेस्टेड असतात. यांचा रहस्यमयी स्वभावच यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.
यांच्या सल्ल्यात असतो खरेपणा
या जन्मतारखेचे लोक कोणालाही सहज किंवा उगाचच सल्ले देत नाहीत. त्यांनी दिलेले सल्ले अनेकदा भविष्यात खरे ठरतात. यामुळे यांच्या जवळचे लोक नेहमी यांची गोष्ट किंवा सल्ले फार गंभीरतेने ऐकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :