Indira Ekadashi 2025 : हिंदू सनातन धर्मात एकादशीला (Ekadashi) फार महत्त्व देण्यात आलं आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये या दिवशी व्रत, स्नान–दान आणि उपवासाचे विशेष महत्व मानले गेले आहे. हा शुभ दिवस भगवान विष्णूची उपासना आणि भक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

इंदिरा एकादशी म्हणजे काय?

इंदिरा एकादशी ही आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. ही 17 सप्टेंबर 2025 ला आहे. ही एकादशी पितृपक्षात येते, त्यामुळे या एकादशीला विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णू यांची उपासना केली जाते आणि पितरांचे श्राद्ध, तर्पण इ. कर्म केली जातात.

पितरांचे उद्धार

या एकादशीचे व्रत केल्याने पितरांना शांती मिळते व त्यांचा आत्मा मोक्षाला जातो. ज्या पितरांना श्राद्ध, तर्पण न मिळालं असेल त्यांना ह्या व्रतामुळे तृप्ती मिळते.

Continues below advertisement

पापक्षालन आणि पुण्यप्राप्ती

या दिवशी उपवास व जागरण केल्याने पापांचा नाश होतो. यामुळे भविष्यातील अडचणी कमी होतात आणि पुण्यसंचय वाढतो.

विष्णूची कृपा

विष्णूंच्या कृपेने कुटुंबात सुख-शांती राहते, धन-धान्य वाढते.

करावयाचे उपाय

  • सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा.
  • भगवान विष्णूला तुळशीपत्र, फुले, नैवेद्य अर्पण करून आरती करावी.
  • “ॐ नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र जपावा.
  • दिवसभर शक्य असल्यास उपवास करावा, नसेल तर फक्त फळाहार करावा.
  • संध्याकाळी विष्णू सहस्रनाम, गीता किंवा विष्णू पुराण वाचावे.
  • पितरांसाठी तर्पण, पाणी अर्पण, श्राद्ध शक्य असल्यास करावे.
  • दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारणा करून व्रत संपवावे.

17 सप्टेंबर 2017 रोजी आलेली इंदिरा एकादशी हीसुद्धा पितृपक्षातील असल्याने त्यावेळी ह्याच नियम आणि महत्व होते.

डॉ. भूषण ज्योतिर्विद                                                                                                                             

Shani Pratiyuti Yog 2025 : शनि-सूर्याचा प्रतियुग योग ठरणार गेमचेंजर; 21 सप्टेंबरपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, धनसंपत्तीत होणार भरभराट