Astrology : आज, रविवार, 11 फेब्रुवारी रोजी चंद्र शनिच्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. याशिवाय आज माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी षष्ठ योग, शिवयोग आणि शतभिषा नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज तयार होत असलेल्या शुभ योगाचा 5 राशींना विशेष लाभ मिळेल. या राशीचे लोक अधिक आनंदी होतील आणि त्यांची प्रलंबित कामं मित्र आणि प्रियजनांच्या माध्यमातून पूर्ण होतील. आजच्या दिवसाच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 11 फेब्रुवारीचा दिवस शुभ आहे. वृषभ राशीचे लोक आज रविवारची सुट्टी असल्याने अपूर्ण कामं पूर्ण करण्यात आणि घरातील लहानांसोबत खेळण्यात दिवस घालवू शकतात. आज तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत काही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचीही शक्यता आहे. शुभवार्तांचे आगमन निरंतर राहील आणि जे काम अपेक्षित नव्हते तेही आज पूर्ण होईल. मुलांना अभ्यासात तुमच्या मदतीची गरज आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं तर, तुम्ही घरात लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल आणि आज नवीन पदार्थाचा आनंदही घेऊ शकता.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आज, म्हणजेच 11 फेब्रुवारीचा दिवस लाभदायक असणार आहे. कर्क राशीच्या लोकांमध्ये आज चांगली ऊर्जा असेल आणि पालक तुम्हाला प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य करू शकतील. अविवाहित लोकांना आज जोडीदार मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते आनंदी होतील आणि सोशल मीडियावरही याची माहिती देतील. सूर्यदेवाच्या कृपेने मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि चालू प्रकल्पात तुमच्या मेहनतीचे कौतुकही होऊ शकते. आज व्यापारी आपला व्यवसाय यशस्वीपणे वाढवतील, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. खूप दिवसांनी तुम्ही एखाद्या मित्राला भेटू शकता, ज्याच्याकडून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. विवाहित लोक आज आपल्या जोडीदारासोबत डिनरसाठी बाहेर जाऊ शकतात, ज्यामुळे नाते आणखी मजबूत होईल.

कन्या रास (Virgo)

आजचा म्हणजेच, 11 फेब्रुवारीचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. कन्या राशीचे लोक आज आपल्या ध्येयाकडे पुढे सरसावतील आणि इतरांच्या मदतीसाठी पुढे येतील. नोकरी करणारे लोक रविवारच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेतील आणि मित्र आणि प्रियजनांसोबत पार्टीच्या मूडमध्ये असतील. तुमच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येत असतील तर आज तुम्हाला त्यापासून आराम मिळेल आणि तुमचे नाते हळूहळू घट्ट होत जाईल. आज घरी धार्मिक विधी केले जाऊ शकतात किंवा तुम्ही तीर्थस्थळी जाऊ शकता. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, कुटुंबात शांती आणि आनंद राहील आणि कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न ठरू शकते.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा, म्हणजेच 11 फेब्रुवारीचा दिवस चांगला जाणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल. वडील आणि तुमच्यात काही मतभेद झाले असतील तर आज ते दूर होतील. आज सकारात्मक वातावरणामुळे तुम्ही आनंदी असाल. कला आणि नाट्य इत्यादींशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आणि अतिशय फायदेशीर असेल. आज विवाहित लोक एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतील, ज्यामुळे त्यांचे नाते मजबूत होईल आणि भविष्यासाठी योजना देखील बनतील. आज तुम्हाला दीर्घ आजारापासून आराम मिळू शकेल. पालकांशी संबंध चांगले राहतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू देखील खरेदी करू शकता.

कुंभ रास (Aquarius)

आजचा म्हणजेच, 11 फेब्रुवारीचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचा अडकलेला पैसाही त्यांना परत मिळू शकेल. तुमच्या वडिलांच्या मदतीने तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला सोशल मीडियावरून चांगली बातमी मिळेल आणि तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही एखाद्या खास व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुले खेळ आणि इतर मैदानी क्रियाकलापांमध्ये जास्त वेळ घालवतील. आज तुम्ही भावंडांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत कराल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Asta 2024 : शनि अस्त होऊन 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक स्थिती होणार मजबूत, मिटणार सारे दु:ख