Horoscope Today, October 10, 2022 : आज चंद्र मीन राशीत आहे. दुपारनंतर तो मेष राशीत प्रवेश करेल. रेवती नक्षत्र आहे. सूर्य कन्या राशीत आहे आणि गुरु मीन राशीत आहे. शनि मकर राशीत आणि मंगळ वृषभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. वृषभ राशीच्या लोकांनी पैसे उधार घेणे टाळा. वाचा संपूर्ण राशीभविष्य..
मेष (Aries Horoscope) : मन अस्वस्थ होऊ शकते. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिनचर्या गोंधळलेली असेल. शैक्षणिक कामात व्यत्यय येऊ शकतो. अवाजवी खर्च वाढतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. मान-सन्मान मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
वृषभ (Taurus Horoscope) : तुम्हाला कामाच्या ठिकाणी मेहनतीने काम करावे लागेल. कोणाकडूनही उधार पैसे घेणे टाळा. तुम्ही कोणतेही काम करत असाल, तर ते शिस्तीबद्ध करण्यावर पूर्ण भर द्या. विरोधकांपासून सावध राहा. ते तुमचे काम बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला जाणार आहे. धार्मिक कार्यात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमची प्रतिमा आणखी उंचावेल.
मिथुन (Gemini Horoscope) : आजचा दिवस धावपळीत आणि विशेष काळजीत जाईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. घरी पाहुणे येऊ शकतात. जॉबमधील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या. नवीन व्यवसायाकडे वाटचाल करू शकाल. आर्थिक बाबतीत धोका पत्करू नका. अन्यथा सगळ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे.
कर्क (Cancer Horoscope) : आज तुम्ही महत्त्वाच्या कामात व्यस्त असाल. नवीन काम सुरू करू शकाल. धार्मिक सहलीचे आयोजन होऊ शकते. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. आज तुम्हाला ऑफिस आणि बिझनेसमध्ये थोडी सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबाकडून तुम्हाला फायदा होईल. भरपूर आनंद मिळू शकतो.
सिंह (Leo Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढेल. अवाजवी खर्च वाढल्याने मन चिंतेत राहील. कामाचा भार जास्त होईल. स्वावलंबी व्हा. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. पालकांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत सतर्क राहा. आर्थिक बाबींचे नियोजन करणे गरजेचे आहे.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. तुम्ही मेहनतीने काम पूर्ण कराल, ज्यामुळे तुमचे नाव आवर्जून घेतले जाईल. कुटुंबातील जबाबदाऱ्यांमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्याशी वाईट बोलू शकतो. व्यवहारात साधेपणा ठेवावा लागेल. सध्या सुरु असलेल्या कोणत्याही आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही.
तूळ (Libra Horoscope) : कठोर परिश्रम केल्यास प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. तुमचे काही पैसे आरोग्य आणि औषधांवर खर्च होऊ शकतात. सामाजिक कार्यात यश मिळेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाचा खूप तणाव असू शकतो. दिखावा करण्याच्या नादात जास्त पैसे खर्च करणे टाळावे लागेल. आज तुमची विश्वासार्हता कामाच्या ठिकाणी सर्वत्र पसरेल. मात्र, एखाद्या व्यवहारात तुमच्याकडून काही चूक होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा आहे. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. कामाचा भार वाढेल. अति राग राग करणे टाळा. एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला मालमत्तेतून पैसे मिळू शकतात. काही मित्र आज तुमच्या मदतीसाठी धावून येणार आहेत. कोणालाही कर्ज देणे टाळावे लागेल, अन्यथा ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
धनु (Sagittarius Horoscope) : कौटुंबिक शांतता ठिकवून ठेवा. अनावश्यक वाद घालू नका. कुटुंबातील सदस्याची तब्येत खराब होऊ शकते. पैसा आणि प्रतिष्ठेला हानी पोहचू शकते. तुमच्या स्वभावात भावनिकता वाढू शकते. सर्जनशीलतेत सकारात्मक वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. प्रियजनांशी जवळीक वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्याच्या स्थितीत असाल.
मकर (Capricorn Horoscope) : व्यवसायात वाढ होऊ शकते, परंतु सध्या काही अडचणी येऊ शकतात. एखाद्या मित्राची मदत मिळू शकते. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात सन्मान मिळू शकतो. लाभाच्या संधी मिळतील. जास्त राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ (Aquarius Horoscope) : आज आर्थिक लाभ होईल. व्यवसायात नवीन काम सुरू करता होईल. आरोग्याबाबत सावध राहा. उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित होऊ शकतात. कोणत्याही मालमत्तेवरून भावंडांशी वाद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यासाठी परदेश दौरा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. भेटवस्तू मिळतील आणि सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक बाजू मजबूत राहील.
मीन (Pisces Horoscope) : आज तुमचा दिवस शुभ आहे. तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ आनंदात जाईल. धार्मिक कार्यात खर्च होईल. प्रवासाचा योग आहे. दुपारनंतर स्वत:वर संयम ठेवा, अन्यथा वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित व्यवहारात सावधगिरी बाळगा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या