Horoscope Today, June 19, 2022 : आज आषाढ महिन्याचा दिवस. सूर्योदयाच्या वेळी धनिष्ठा नक्षत्र आणि चंद्र कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. सूर्य वृषभ राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचा मित्र आणि प्रियजनांसोबत दिवस खूप चांगला जाईल. वृषभ राशीच्या लोकांनी आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. जाणून घेऊया आजचे राशीभाविष्य...
मेष (Aries Horoscope) : सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. मित्र आणि प्रियजनांसोबत दिवस खूप चांगला जाईल. मित्रांच्या मागे पैसे खर्च होतील आणि त्यांच्याकडून लाभही मिळू शकेल. कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. नोकरदार लोकांचा दिवस सामान्य राहील. तथापि, व्यवसायात चांगला नफा अपेक्षित आहे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकेल. वैवाहिक जीवनात शांतता आणि सौहार्द राहील. उत्पन्नाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.
वृषभ (Taurus Horoscope) : आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमचा शांत स्वभाव तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात मदत करेल. अनपेक्षित कारणांमुळे तुमच्या काही कामात व्यत्यय येऊ शकतो. सामाजिक आणि राजकीय कामात जास्त वेळ घालवू नका. व्यवसायाशी संबंधित कामात आज थोडी सुधारणा होऊ शकते. जोदापत्य हिव्नात आनंद राहू शकतो. तब्येत ठीक राहील.
मिथुन (Gemini Horoscope) : राजकीय जीवनात प्रगती होऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. आर्थिक लाभ मिळू शकतो. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च जास्त होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात रस वाढेल. वादापासून दूर राहणे चांगले. जवळच्या मित्राचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. कोणाची चूक खपवून घेऊ नका. प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध ठेवा.
कर्क (Cancer Horoscope) : भावनिकदृष्ट्या शहाणपणाने वागल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने बदलू शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या योजनांचा विचार करा. व्यवसायाची परिस्थिती आज चांगली होऊ शकते. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. प्रत्येक विषयात सावधपणे वागावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. अधिक खर्च होण्याचीही शक्यता आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि नियमांविरुद्ध कोणतेही काम करू नका.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात भागीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील, परंतु घरातील एखाद्याच्या तब्येतीमुळे तुम्ही चिंतेत असाल. सामाजिक जीवनात यश मिळेल. मित्रांना भेटू शकाल. अनावश्यक पैसे खर्च होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा विचार करा.
कन्या (Virgo Horoscope) : गुंतवणुकीवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुम्हाला प्रत्येक कामाचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. बदनामी होण्याचीही शक्यता आहे. आपल्या कामांबद्दल कोणालाही सांगू नका. तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने तुम्हाला मार्केटमध्ये काही यश मिळू शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभही होतील आणि यशही मिळेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने आनंद मिळेल.
तूळ (Libra Horoscope) : वादविवाद किंवा बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. आज नवीन काम सुरू करू नका. एखाद्या प्रिय व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकते. वादात मान-सन्मान हानी होण्याची भीती राहील. नोकरदारांनी फक्त त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांची मदत घेऊ शकता. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनावश्यक राग टाळा. व्यवसायात नफा वाढेल. आशा आणि निराशेच्या संमिश्र भावना मनात राहतील. संभाषणात संयम ठेवा.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जमीन, वाहन खरेदीची कागदपत्रे बनवताना काळजी घ्या. नोकरदार लोकांना आज काम करणे कठीण जाईल. व्यवसायातही आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. कोणाला वचन दिले असेल, तर ते पूर्ण करा, नाहीतर लोकांमध्ये तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळे अशक्तपणा जाणवेल.
धनु (Sagittarius Horoscope) : मानसिक शांती आणि आनंद मिळू शकेल. मित्रांसोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. आज तुम्ही नवीन काम सुरू करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यपद्धतीचे कौतुक होईल. व्यवसायात आर्थिक लाभासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. नातेवाईक किंवा मित्रांशी दीर्घ संभाषण होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.
मकर (Capricorn Horoscope) : शेअर बाजारात नशीब आजमावू शकता. तुम्हाला कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीतही रस असेल. अचानक आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. आरोग्य मध्यम राहील आणि डोळे दुखू शकतात. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसायात लाभाची आशा राहील. हुशारीने काम करा, जमिनीशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थित तपासा. पैशाचे व्यवहार न केल्यास बरे होईल.
कुंभ (Aquarius Horoscope) : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला मोबाईल किंवा ईमेलद्वारे एखादी महत्त्वाची सूचना मिळाल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्च वाढेल. आपल्या बजेटचे भान ठेवा. न्यायालयीन प्रकरणांमध्ये कोणाशी तरी चर्चा करावी लागेल. तुमचा स्वभाव आणि अहंकार यांवर मात करा. अन्यथा गोष्टी बिघडू शकतात. तसेच कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जाऊ शकते.
मीन (Pisces Horoscope) : कार्यशैली आणि स्वभाव वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. आजचा दिवस खूप नवीन माहिती मिळवण्याचा दिवस असेल. सामाजिक उपक्रमातही सहभागी होऊ शकता. एखादे रखडलेले कामही आज पूर्ण होऊ शकते. कोणताही त्रास झाल्यास ज्येष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा. त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य तुमचे मनोबल वाढवेल. विद्यार्थी आणि तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कुटुंबासोबत मौजमजेत आणि आनंददायी कामांमध्ये वेळ जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा :