Horoscope Today, July 25, 2022 : आज मृगशीर्ष नक्षत्र असून, चंद्र वृषभ राशीत आहे. दुपारी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. शनि आज मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अनुकूल आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या कामाची प्रशंसा होईल. जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुमच्या बोलण्यात संयम ठेवा, अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. येणारा काळ अनुकूल आहे. भावंडांमध्ये प्रेम वाढेल. चिंतेत वाढ आणि उत्साह कमी होईल. या काळात तुम्ही ऑफिसच्या कामात कमी रस घ्याल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल भावूक व्हाल. अनावश्यक खर्च वाढल्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते.
वृषभ (Taurus Horoscope) : एखादे महत्त्वाचे कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही असाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ आनंदात जाईल. मित्रासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल. अचानक बालपणीच्या मित्राची भेट होऊ शकते. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करता येतील,
मिथुन (Gemini Horoscope) : तुमचे वैवाहिक जीवन रोमँटिक असेल. थोडी चिंता राहील. अज्ञात व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही प्रकारची समस्या नसतानाही मन अस्वस्थ राहील. विरोधकांपासून सावध राहा. घरातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका, अन्यथा ते अपूर्ण राहील. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कर्क (Cancer Horoscope) : व्यवसायात आज फायदा होण्याची शक्यता आहे. आयात-निर्यातीच्या कामातही फायदा होऊ शकतो. पर्यटनस्थळाला भेट देण्याची योजना आखू शकता. दुपारनंतर थोडा आळस वाटेल. काम करावेसे वाटणार नाही. एखाद्या आजारांमुळे वेदना वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांसाठी पैसा खर्च करण्यात आनंद वाटेल. व्यवसायात आकर्षक ऑफर मिळू शकते. कामात आणि व्यवसायात सकारात्मक प्रगती होईल.
सिंह (Leo Horoscope) : व्यावसायिक दृष्टिकोनातून काही चांगले संकेत आहेत. व्यवसायात सकारात्मक प्रगती होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. मित्र आणि परिवाराकडून भेटवस्तू मिळू शकतात. व्यवसायात नवीन संपर्कातून भविष्यात नफा मिळण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo Horoscope) : तुमच्या व्यवसायातून इतर लोकांनाही फायदा होईल. तुमची सकारात्मक ऊर्जा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या. दूरच्या नातेवाईकांशी भेट होऊ शकते. अधिकारी तुम्हाला काही कामात साथ देतील. जर कुटुंबातील लोकांमध्ये मतभेद सुरू असतील, तर ते देखील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मदतीने संपतील. भावंडांसोबत वेळ घालवाल. आज तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करू शकता.
तूळ (Libra Horoscope) : सामाजिक कार्य किंवा राजकारणाशी संबंधित लोकांना काही महत्त्वाची कामगिरी मिळेल. सर्जनशील क्षेत्रात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल. या दिवशी थोडी बचत करून स्वतःसाठी वेळ काढा. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्यात विशेष काळजी घ्या. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. जास्त कामामुळे तुम्हाला आळस आणि मानसिक चिंता जाणवेल.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : तुम्ही कुटुंबात आनंद अनुभवाल. कुटुंबीयांसह सामाजिक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळेल. एखादी सहल आयोजित होऊ शकते. जोडीदारासोबतच्या समस्या दूर होतील. जीवन उत्साह आणि आनंद वाटेल. व्यवसायात लाभ होईल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. गरिबांना मदत करा. आर्थिक स्थिती चांगली राहील.
धनु (Sagittarius Horoscope) : आज प्रत्येक कामात सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार तुमचे विचार स्वीकारेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या गुंतवणूक योजनेच विचार करू शकता. कार्यालयात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. लोक तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक करतील.
मकर (Capricorn Horoscope) : मेहनतीपेक्षा कमी फळ मिळेल. तरीही तुम्ही मेहनतीने काम कराल. आरोग्य चांगले राहील. बाहेरचे पदार्थ खाणे पिणे टाळावे. दुपारनंतर अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शांतता आणि संयम ठेवावा. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि वरिष्ठांशी मतभेद होतील, परंतु त्यात काहीही बोलणे टाळावे.
कुंभ (Aquarius Horoscope) : अडकलेले पैसे परत मिळतील. आज तुमचे अपूर्ण काम सहज पूर्ण होईल. व्यवसायात भागीदारीमुळे फायदा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. सामाजिक कामात तुम्ही पुढे असाल. आज नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्याने तुम्हाला फायदा होईल. यशात कोणताही अडथळा येणार नाही. एखाद्या लांबच्या प्रवासाचे आयोजन करण्याची योजना असेल, तर तूर्तास ते टाळणे हिताचे असेल.
मीन (Pisces Horoscope) : कल्पनेच्या जगात अधिक रममाण व्हाल. यामुळे तुमच्या कामाला योग्य दिशा मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाण्याचा कार्यक्रम होईल. दैनंदिन कामातही आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दिवसभर काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक चिंता वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन बदल करणे टाळावे. व्यवसायाचा विस्तार करू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :