Horoscope Today, August 31,  2022 : आज चित्रा नक्षत्र असून, चंद्र दुपारी कन्या राशीत प्रवेश करेल. सूर्य सिंह राशीत तर, शनि मकर राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. मेष राशीच्या लोकांचा तणाव दूर होऊन, मन प्रसन्न राहील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. वाचा संपूर्ण राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या ताजेतवाने वाटेल. घरातील वातावरण चांगले राहील. आर्थिक लाभासोबतच व्यवसाय आणि नोकरीत समाधानाचा अनुभव येईल. सामाजिक दृष्टिकोनातून तुमची प्रतिष्ठा वाढेल. मित्र आणि प्रिय व्यक्तींचे सहकार्य मिळाल्याने आनंद होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. तणाव दूर होऊन, मन प्रसन्न राहील.


वृषभ (Taurus Horoscope) : आज तुमचा दिवस सामान्य असेल. आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. पण खर्चाचा भारही वाढेल. कामात व्यस्त असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ आहे. पद प्रतिष्ठा वाढू शकते. परीक्षेत किंवा स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील.


मिथुन (Gemini Horoscope) : शैक्षणिक कार्यात यश मिळेल. स्थावर मालमत्तेच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. कामात अधिक धावपळ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीत अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. नोकरीत बदल होण्याचीही शक्यता आहे. उत्पन्न वाढेल.


कर्क (Cancer Horoscope) : कोणतेही काम विचारपूर्वक हाती घ्या. आज नातेवाईक किंवा मित्रांशी भेट होऊ शकते. त्यांच्या भेटीने तुम्हाला आनंद होईल. विरोधकांवर विजय मिळवाल. दुपारनंतर काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीमुळे तुम्ही चिंतेत असाल. कोणताही अनावश्यक खर्च आर्थिक अडचण निर्माण करू शकतो.


सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल होऊ शकतात, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. कोणतेही काम हातात घेतले तरी यश मिळेल. व्यापारी वर्गाला नव्या संधी मिळतील, उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतील. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. मित्रांसोबत दिवस आनंदात घालवाल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.


कन्या (Virgo Horoscope) : तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलू शकता, त्यानंतर तुम्हाला त्यांचे समाधान नक्कीच मिळेल. एखाद्या कामाच्या संदर्भात तुमच्या मनात काही दुविधा चालू असेल, तर ते काम अजिबात करू नका. तुम्हाला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला, तर त्यातही तुम्ही संयम बाळगला पाहिजे, तरच तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडू शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील.


तूळ (Libra Horoscope) : आर्थिकदृष्ट्या, आजचा दिवस चांगला असेल. परंतु, आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. कामाच्या ठिकाणी दिवस व्यस्ततेचा असू शकतो. तुम्हाला कामाचा ताण जाणवेल, त्यामुळे वागण्यात चिडचिड होऊ शकते. विनाकारण वादात पडू नका, शांतपणे वागा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजच दिवस योग्य नाही. आर्थिक नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठीण जाईल.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : जीवनसाथी निवडण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. उत्पन्न आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवासाचा बेत आखू शकता. दुपारनंतर तुमच्या स्वभावात राग आणि उग्रपणा वाढू शकतो. कोणाशीही रागाने वागू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मतभेद झाल्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या चिंतेत राहू शकता. याचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो.


धनु (Sagittarius Horoscope) : आज दिवसभर शांत राहा, अनावश्यक राग-वाद टाळा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्या. कामच भर वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. बंधू-भगिनींचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता. मित्रांचे सहकार्य लाभेल.


मकर (Capricorn Horoscope) : आजचा दिवस अनुकूल परिणाम देईल. दिवस तुमच्यासाठी अनेक बाबतीत चांगला राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील, लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नवीन आर्थिक योजनांवर भांडवल गुंतवाल, जे भविष्यात फायदेशीर सिद्ध होईल. व्यापाऱ्यांना विशेष फायदा होईल. धनलाभाच्या संधी मिळतील. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना काही गोष्टीत लाभ होणार आहे.


कुंभ (Aquarius Horoscope) : आजचा दिवस आनंदाचा असेल. आर्थिक प्रश्न सुटतील, आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील, सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, मान-सन्मान वाढेल. व्यवसायात तेजी येईल, यशाचे नवीन मार्ग खुले होतील. उत्पन्नाचे विविध स्त्रोत दिसतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.


मीन (Pisces Horoscope) : आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी मेहनत घेऊन सर्व कामे पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचे कौतुक होईल. व्यावसायिक प्रकरणे मार्गी लागतील, लाभाच्या संधी प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. खर्च जास्त असतील, पण अचानक आर्थिक लाभही होईल. कोणतीही मोठी भांडवली गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या


Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत


Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय