Bollywood : प्रसिद्ध अभिनेत्रीशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीवर पैशांच्या लालसेपोटी अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार कोची येथील एर्नाकुलम सेंट्रल पोलिस स्थानकातून समोर आला आहे. दक्षिणेतील अभिनेत्री श्वेता मेनन यांच्याविरोधात आर्थिक फायद्यासाठी अश्लील चित्रपट व जाहिरातीत काम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलयाळम वृत्तसंस्था 'मातृभूमी'च्या माहितीनुसार, सामाजिक कार्यकर्ता मार्टिन मेनाचेरी यांनी श्वेता मेनन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाने स्थानिक पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. आता अश्लीलता प्रतिबंधक कायदा आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्रीवर अश्लील चित्रपटात काम केल्याचा आरोप
श्वेता मेनन यांच्याविरुद्ध आता पोलिसांनी एफआयआर (गुन्हा) दाखल केला आहे. श्वेता फक्त दक्षिणेतील नाही, तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. त्यांनी रथिनिर्वेदम आणि साल्ट एन पेपर यांसारख्या मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर हिंदीत बंधन (सलमान खान) आणि अशोका यांसारख्या चित्रपटांमध्येही त्या झळकल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, श्वेता मेनन यांनी आर्थिक फायद्यासाठी कथितपणे अश्लील चित्रपट आणि जाहिरातीत काम केले.
कोण आहेत श्वेता मेनन?
तक्रारीत श्वेता मेनन यांनी एका कंडोमच्या जाहिरातीत काम केल्याचा उल्लेखही आहे. 23 एप्रिल 1974 रोजी जन्मलेल्या श्वेता मेनन या चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली आणि नंतर टेलिव्हिजन अँकर आणि अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली. 1994 साली त्या मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा किताब जिंकल्या होत्या. त्यांनी मलयाळमसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी दोन केरल राज्य पुरस्कार ‘सर्वोत्तम अभिनेत्री’ म्हणून जिंकले आहेत तसेच दोन दक्षिण फिल्मफेअर पुरस्कारही पटकावले आहेत.
आमिर खान आणि अजय देवगणसोबत काम
हिंदी चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर श्वेता मेनन यांनी 1997 साली आलेल्या इश्क चित्रपटात ‘हमको तुमसे प्यार है’ या गाण्यात डान्स नंबर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्या सलमान खानच्या बंधनमध्ये आणि अजय देवगणसह अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांत दिसल्या. त्यांनी सुमारे 30 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या