Horoscope Today 5 March 2025 : पंचांगानुसार, आज 5 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार बुधवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

घरातील कर्तव्यांना प्राधान्य द्याल त्यामुळे घरातील लोकांची वाहवा मिळवाल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

नवीन जबाबदाऱ्या कुशल त्याने हाताळाल हे सर्व करताना थोडा विक्षिप्तपणा ही इतरांना जाणवेल.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

पैशाची परिस्थिती सुधारेल महिलांना थोडी मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आज नेहमीपेक्षा जरा जास्त कष्ट घ्यावे लागतील परिस्थितीशी झगडण्यात शक्ती खर्च करावी लागेल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

घरामध्ये टापटीप स्वच्छता याकडे जरा बारकाईने लक्ष द्याल स्वतःसाठी थोडी खरेदी ही कराल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

एखाद्या गोष्टी पासून सुख कसे मिळवावे हे तुम्हाला सांगावे लागणार नाही उत्साह आणि आनंद वाटेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

नवीन ओळखी होतील आणि मित्र परिवाराच्या गाठीभेटी ही पडतील.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळा हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातलीत तर फायद्याचे ठरेल. 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

कोणाचाही विरोध सहन करणार नाही अति स्पष्ट वक्तेपणा टाळण्याकडे कल ठेवा.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

महिलांना कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल कलाकारांची कला बहरेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

तुमच्या कलागुणांना वाव मिळेल काही नावीन्यपूर्ण गोष्टी हातून घडतील.

मीन रास (Pisces Horoscope Today)

आर्थिक नियोजन करून योग्य ठिकाणी पैसा गुंतवून टाकावा त्यासाठी योग्य दिवस आहे.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Astrology : 5 मार्चचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेम चेंजर, वाईट काळ संपणार; आयुष्यात घडतील मोठे बदल