Horoscope Today 29 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुमचा ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या वादातून बाहेर पडू शकता.


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल. आज तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो.


विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एकटं वाटू शकतं, तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


आरोग्य (Health) - आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा.


वृषभ रास (Taurus Today Horoscope)


नोकरी (Job) - तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.


व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.


विद्यार्थी (Student) - तरुणांना सोशल मीडियावर त्यांचे जुने मित्र भेटू शकतात, अचानक हे मित्र तुमच्या नजरेत आल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही त्यांच्याशी बोलाल. 


आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला कानाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.


मिथुन रास (Gemini Today Horoscope)


नोकरी (Job) - जे लोक महत्त्वाचा डेटा हाताळतात त्यांना आज काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षितपणे ठेवावा लागेल. तुम्ही नोकरीत काही अडचणी आल्यास त्वरित वरिष्ठांशी बोला.


व्यवसाय (Business) - जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, 


विद्यार्थी (Student) - तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.


आरोग्य (Health) - आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये सहकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुमची प्रगती होईल. 


व्यापार (Business) - आज तुम्हाला व्यापाऱ्याशी संबंधित तोटा होऊ शकतो. अशा वेळी जास्त ताण न घेता कामाचाच एक भाग म्हणून सोडून द्या.  


तरूण (Youth) - घराबाहेर पडताना घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्या. तुमची सगळी कामं पूर्ण होतील. 


आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


नोकरी (Job) - तुम्हाला आज कदाचित प्रमोशनची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप उत्साही असाल. 


व्यापार (Business) - आज व्यवसायात कोणताही मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. वरिष्ठांचा योग्य सल्ला घ्या. 


तरूण (Youth) - आज तुमचं पूर्णपणे लक्ष समाजसेवा करण्यात असू शकतं. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल.


आरोग्य (Health) - तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमधलं वातावरणही चांगलं राहील.


व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात काही नवे बदल आणू इच्छित असलात तर तुम्ही त्यात यशस्वी व्हाल.


तरूण (Youth) - प्रेमसंबंधात तुमचं सगळं व्यवस्थित सुरु राहणार आहे.  तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. 


आरोग्य (Health) - दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा. 


तूळ रास (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - आज तुमचे विरोधक तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कट रचू शकतात, परंतु तुम्ही त्यातून सुटू शकता आणि तुमचा विरोधक स्वतः त्या कटात अडकू शकतो.


व्यवसाय (Business) - आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात मोठी संधी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक चांगला होईल आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. 


विद्यार्थी (Student) - तरुण आपल्या कौशल्याने काही मोठं काम करून यश मिळवू शकतात, त्यात तुमची आर्थिक स्थितीही मजबूत असेल.


आरोग्य (Health) - जर तुम्ही खूप दिवसांपासून मानसिक तणावातून जात असाल तर आज हा ताण कमी होऊ शकतो. तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेत राहा.


वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)  


नोकरी (Job) - आज तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यामुळे काम थांबेल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं.


व्यवसाय (Business) - आज तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगलं काम कराल, तुमची आर्थिक स्थितीही मजबूत राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल.


विद्यार्थी (Student) - आज कुटुंबीयांबरोबर तुमचा दिवस अगदी आनंदात जाईल. घरात एकोपा दिसेल. 


आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु बाहेरील कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळावं, अन्यथा तुमची प्रकृती बिघडू शकते आणि तुम्हाला पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.


धनु रास (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - आज तुमचे ज्युनिअर आणि सिनीअर तुम्हाला कामात मदत करतील, आज तुमचं मन कामात गुंतलेलं असेल.


व्यवसाय (Business) - व्यवसायात लाभ होईल. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे.


विद्यार्थी (Student) - सीएस आणि आयटीच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचं नियोजन करावं.


आरोग्य (Health) - तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नियमित योगासनं आणि ध्यानधारणा करावी आणि तसेच सकाळी गवतावर अनवाणी चालावं, तरच तुमचं शरीर निरोगी होऊ शकते.


मकर रास (Capricorn Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुमची नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीने काम कराल.


व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.  


कौटुंबिक (Family) - तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही थोडे चिंतित असाल. तुमच्या जीवनात यश मिळवण्यासाठी अनावश्यक भांडणांपासून दूर राहा.


आरोग्य (Health) - आज मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं सुटू शकतात, ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक शांती मिळेल. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.


कुंभ रास (Aquarius Today Horoscope)


नोकरी (Job) - तुम्हाला कामावर काही नवीन संधी मिळतील ऑफिसमध्ये तुम्ही नाव कमवाल. लक्ष देऊन काम करत राहा.


व्यवसाय (Business) - आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा खूप विस्तार करू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कुणालाही चुकीचं बोलू नका. 


विद्यार्थी (Student) - तरुणांना त्यांचं खरं प्रेम मिळण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याची मदत घ्यावी लागेल.


आरोग्य (Health) - तुम्ही गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते. 


मीन रास (Pisces Today Horoscope)


नोकरी (Job) - तुमच्या ऑफिसचं वातावरण आज तुम्हाला आज खूप अडचणीत टाकू शकतं, परंतु तुमच्या हुशारीने तुम्ही सर्व अडचणींवर मात करू शकाल.


व्यवसाय (Business) - नशिबामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. व्यवसायात तुमच्या सकारात्मक वृत्तीमुळे तुम्ही प्रत्येक परिस्थिती नीट हाताळाल.


विद्यार्थी (Student) - तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.  


आरोग्य (Health) - आज तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, हाड किंवा अंग दुखण्याची समस्या तुम्हाला सतावू शकते, या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थ खा, तुमचं आरोग्य सुधारेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 29 August 2024 : आज 'या' 3 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा, मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा आजचे राशीभविष्य