Nitin Gadkari: आम्ही घरी असताना राजकारणावर कधीही चर्चा करत नाही, राजकारणावर आम्ही चर्चा करण्याऐवजी नेहमीच खाण्या-पिण्यावर चर्चा करतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळी राजकारणामध्ये कुठे गेलं पाहिजे, स्वप्न काय आहे याचा आग्रह कधीच केला नव्हता. आयुष्यामध्ये या गोष्टींचा मी कधीच कॅल्क्युलेशन केली नाहीत. आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल तर भविष्याचा विचार सोडून द्या, असा कानमंत्र आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज एबीपी माझाच्या विशेष माझा महाकट्टामध्ये बोलताना दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी कांचन गडकरी होत्या. यावेळी दोघांनी स्वतः गेल्या चार दशकांमधील वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. किचनमध्ये काम करताना तणाव कमी होतो, असेही कांचन गडकरी यांनी सांगितले. 

Continues below advertisement

वाईट गोष्टीचं उदात्तीकरण होता कामा नये

नितीन गडकरी, पत्नी कांचन यांनी काही कौटुंबिक किसे सुद्धा सांगितले. विवाहबद्ध झाल्यानंतर पहिली काही वर्ष एकमेकांची खोलीमध्ये भांडणात गेल्याचेही त्या म्हणाल्या. जेव्हा जेव्हा मी माणसे घरी जेवायला सांगत होतो, तेव्हा तेव्हा माणसे सांगितल्यापेक्षा नेहमीच डबल येत होती. त्यामुळे चिडचिड होत होती, असा किस्सा कांचन यांनी सांगितला. पत्नी विषयी बोलताना  गडकरी म्हणाले की, मी राजकारणात सक्रिय असल्याने मुलांना संस्कार देण्यात, घरची सगळी जबाबदारी कांचनने पार पाडली. गडकरी म्हणाले की आपण आयुष्यामध्ये रिकाम्या हाताने आलो आहोत, रिकाम्या हाताने परत जाणार आहोत. वाईट गोष्टीचं उदात्तीकरण होता कामा नये असेही गडकरी यांनी यावेळी सांगितल. माझ्या स्वागतासाठी कधी कोणी विमानतळावर हार तुरे घेऊन येत नाही, मी फोटो सुद्धा काढत नाही असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. 

आम्हाला खायला घालायला खूप आवडतं

कांचन गडकरी यांनी सुद्धा आपल्या वैवाहिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, आई आणि सासूबाईंनी मला पाठबळ दिल्याने ही माझ्या वैवाहिक आयुष्यामध्ये समाधानी असल्याचं त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की आम्हाला खायला घालायला खूप आवडतं, तसेच खायला सुद्धा खूप आवडतं. आयुष्यामध्ये 2009 ते 10 हा कालखंड होता तो आपल्यासाठी खूप संघर्षपूर्ण होता. या कालखंडामध्ये आमची कुलदैवता रेणुका श्रद्धास्थान असल्याने आम्ही सहीसलामत बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदा 8-10 वर्षानंतर भांडण कमी झाल्याचेही गडकरी यांनी नमूद केलं. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या