Horoscope Today 28 June 2024 : पंचांगानुसार, आज 28 जून 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास  (Aries Horoscope Today)


महिलांना कुटुंबात तारेवरची कसरत करावी लागेल. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आर्थिक घरी चांगली बसल्यामुळे खुश राहाल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडण्यात यशस्वी व्हाल. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


मनस्वास्थ्य मिळेल. थोडा तापटपणा बाजूला ठेवल्यास सर्व गोष्टी सुरळीत होतील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


अस्थिर आणि चंचल मन राहील त्यामुळे कोणतेही निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कोणत्याही समस्या पेक्षा आपण खूप मोठे असतो हे लक्षात ठेवून तुमच्यातील चांगल्या गुणांचा आढावा घेतल्यास दिवस सुखावह जाईल.


तुळ रास  (Libra Horoscope Today)


महिला जे ठरवतील ते पार पाडतील. घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहील.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वाद-विवाद भांडणे या गोष्टींमुळे मनावर ताण येईल. यावेळी जोडीदाराचे सहकार्य मिळणार नाही. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


कलाकारांना आपल्या कलेला दाद मिळाल्याचे पाहता येईल. समाजासमोर तुमच्या कलेचे कौतुक पाहताना खूपच आनंद वाटेल.


मकर रास  (Capricorn Horoscope Today)


नोकरी व्यवसायात कामाची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे स्वस्थ राहणार नाही.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाला तोंड द्यावे लागेल. या सर्व परिस्थितीत विवेक आणि विचार यांचा आधार घ्यायला हवा.


मीन रास (Pisces Horoscope Today)


जगण्यासाठी विचारांचा नेटकेपणा उपयोगी पडेल आणि विचारांच्या शिस्तीसाठी साधना आवश्यक ठरेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


July Planet Transit 2024 : गुड न्यूज! कर्क राशीत जुळून येणार अद्भूत युतीचा खेळ, 'या' 3 राशींना अचानक होणार धनलाभ, सुख-समृद्धीत होणार भरभराट