Horoscope Today 27 October 2024 : पंचांगानुसार, आज 27 ऑक्टोबर 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


आज तुमच्या तापट स्वभावाला आळा घालावा लागेल. व्यवसाय-नोकरीत दुसऱ्यांशी बोलताना दहा वेळा विचार करा.


वृषभ (Taurus Horoscope Today)


स्पष्ट आणि परखड बोलण्यामुळे लोकांची मनं दुखावली जात नाहीत ना हे समजून घेणे महत्त्वाचे ठरेल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


तरुण वर्ग आपल्या जोडीदार निवडण्यात यशस्वी होतील, विवाह ठरतील.


कर्क (Cancer Horoscope Today)


महिला मंगल कार्याच्या गडबडीत राहतील. कोणत्याही अडचणीतून मार्ग काढाल.


सिंह (Leo Horoscope Today)


तुम्हाला आवश्यक वाटणारी सुखं हात जोडून तुमच्यासमोर उभी राहतील. 


कन्या (Virgo Horoscope Today)


जोडीदाराबरोबर सुसंवाद साधण्यासाठी आवश्यक त्या संधी मिळतील.


तूळ (Libra Horoscope Today)


घरामध्ये तरुण वर्ग येणार आहे त्यामुळे हलकेफुलके चेष्टा मस्करीचे वातावरणात रमून जाल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


आज तुमच्या जवळील कल्पनाशक्तीने कामाची ताकद वाढवाल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त कराल. थोडा राग आवरावा लागेल.


मकर (Capricorn Horoscope Today)


अस्थिर आणि चंचल मनोवृत्तीला तोंड द्यावे लागेल. आर्थिक स्थिती सुधारेल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


महिला घरातील सण समारंभाच्या तयारीत गुंतून जातील. स्वतःमध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल.


मीन (Pisces Horoscope Today)


कठीण प्रसंगात मानसिक दरबारीवर मात करून पुढे येण्याची ताकद  पणाला लावाल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Rahu Gochar 2025 : नवीन वर्षात राहूची शनीच्या राशीत वक्री; 5 राशींचं नशीब फळफळणार, नवीन नोकरीसह धनलाभाचे संकेत