Horoscope Today 27 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 फेब्रुवारी 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आजच्या दिवशी भक्त देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. तसेच, उपवास धरतात. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ मिळावं तसेच, भविष्य चांगलं जाण्यासाठी लोक देवीकडे प्रार्थना करतात. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच गुरु ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी उद्याचा दिवस प्रामाणिकपणाचा असणार आहे. तुमच्या कामात प्रामाणिकपणा दिसून येईल. सकारात्मक दृष्टीकोन तुमच्यात दिसून येईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. नवीन कार्याची सुरुवात तुम्ही या दरम्यान करु शकता. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी उद्याचा दिवस मान-सन्मानाचा असणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या नोकरीच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. कामाचं जास्त प्रेशर घेऊ नका. तसेच, तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबूनही राहू नका. वर्क लाईफ बॅलेन्स करणं गरजेचं आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी उद्याचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. या कालावधीत तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तसेच, गॉसिपिंगपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबियांचा विचार करा.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी उद्याचा दिवस सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्ही कोणतंही महत्त्वाचं पाऊल उचलू नका. तुमच्या कामाच्या बाबतीत अनेक चढ-उतार तुम्हाला जाणवतील. तसेच, ऑफिसमधलं पॉलिटिक्स तुमच्यासाठी नकारात्मक ठरु शकतं. ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी उद्या शुक्रवारचा दिवस लाभदायी असेल. दिवसाच्या शेवटी तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमच्या मेहनतीवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असणार आहे. करिअरच्या बाबतीत तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, हाती आलेलं प्रोजेक्ट जबाबदारीने तुम्ही पार पाडाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तसेच, उत्पन्नाची साधनेही तुमच्यासमोर उपलब्ध होतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी उद्याचा दिवस सर्वसामान्य असणार आहे. या कालावधीत कोणतीही महत्त्वाची तसेच, जोखमीची कामं हाती घाऊ नका. तुमची रखडलेली कामे वेळीच पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी उद्याचा दिवस सामान्य असणार आहे. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही तुमच्या पार्टनरवर फोकस करावा. तसेच, मानसिक स्वास्थ्यासाठी नियमित योगा, ध्यान करणं गरजेचं आहे. रागावर नियंत्रण ठेवणंही गरजेचं आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी उद्याचा दिवस चांगला असेल. पार्टनरबरोबर तु्ही आनंदाने वेळ घालवू शकता. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी उद्याचा दिवस शुभकारक असेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने कराल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. कोणाच्या अध्यात मध्यात पडू नका. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. तणावापासून दूर राहण्यासाठी नियमित योग करणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

March 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा महिना ठरणार गेमचेंजर, 6 पैकी फक्त 2 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य