Horoscope Today 27 August 2024 : पंचांगानुसार, आज 27 ऑगस्ट 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


अति भावनाप्रधान माणसाचा जगात निभाव लागत नाही, त्यामुळे भावनाप्रधान होऊ नका.


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आज प्रवासाचे योग आहेत, फक्त प्रवासातल्या चीज वस्तूंची काळजी घ्या.


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे चांगले आर्थिक लाभ होतील.


सिंह रास (Leo Horoscope Today)


अडथळ्यांच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


आज कष्ट किती केले याचा हिशोब करायचा नाही, तरच मानसिक समाधान मिळेल.


तूळ रास (Libra Horoscope Today)


जवळच्या माणसांच्या विचारांची देवाण-घेवाण होईल. नवीन विचारांचा मागोवा घ्याल.


वृश्चिक रास  (Scorpio Horoscope Today)


तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल. महिलांचा लोकांवर प्रभाव पडेल.


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


तुमच्या गोड आणि हजरजबाबी बोलण्यामुळे लोकांचे सहकार्य मिळेल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


बुद्धी आणि व्यवहार यांची  सांगड योग्य तऱ्हेने घातल्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्यामुळे समाधान मिळेल.


मीन रास (Pisces Horoscope Today)


घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Dahi Handi 2024 Wishes : दहीहंडीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश