Horoscope Today 26 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 26 मे 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान भोलेनाथाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज निराशेच्या गर्दीत न जाता, सकारात्मक विचारांचा मागोवा घ्यावा.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक बाबतीत एखादे वेळी नको ती उलाढाल होऊन सतत कष्ट करूनही म्हणावा असा फायदा मिळणार नाही 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज मेंदू आणि मनावरचा ताण घालवण्यासाठी उपासना आणि प्राणायामचा आधार घ्या   

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज मुलांच्या करिअरच्या दृष्टीने थोडीशी वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ शकते  

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज तुमचे प्रयत्न फळाला येतील, जोडीदारामध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होतील    

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांचा अभ्यासापेक्षा खेळाकडे जास्त कल राहील  

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी थोड्याशा टोकाच्या भूमिका घेतल्यामुळे ताण निर्माण होतील     

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो कलाकारांनी चांगल्या कलाकृती निर्माण केल्या, तरी त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या कष्टांमध्ये कमतरता भासेल    

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज करमणुकीच्या गोष्टींवर भर दिला जाईल, जवळचे प्रवास करता येतील  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना अनेक संधी मिळतील, महिलांनी सखोल विचार करणे आवश्यक ठरेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या समोर असलेल्या लहान मोठ्या समस्यांवर मात करू शकता, हा दृष्टिकोन तुम्हाला फायद्याचा ठरेल   

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज कारण थोडी शारीरिक अस्वस्थता जाणवेल, पचेल तेच खाणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Garud Puran 2025:  ते रहस्यमय दार.. हातावरील रेषा.. मृत्यू तासाभरात येणार असेल, 'असे' संकेत फार कमी लोकांना माहीत, गरुड पुराणात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)