Horoscope Today 25 March 2025: पंचांगानुसार, आज 25 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार मंगळवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे भरपूर काम कराल, आरोग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मानसिक समाधान लाभेल. आज आपण काय करू शकतो, याचा विचार नक्कीच कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो हाती घ्याल ते तडीस न्याल, तर यश येईल, वैवाहिक सौख्यामध्ये तडजोड करावी लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो जोडीदाराचे आरोग्य सांभाळावे लागेल, पित्त प्रकृती असणाऱ्यांना पथ्य पाळावी लागतील
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो गरजेला तुम्ही उपयोगी पडाल का, हे म्हणण्याची संधी इतरांना देऊ नका
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज निर्भीड आणि निकोप मानसिकतेमुळे आघाडीवर राहाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो जरुरी पेक्षा जास्त आत्मविश्वास ठेवल्यामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडी सावधानता बाळगावी लागेल, अहंकार ठेवू नये
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो खाजगी किंवा सरकारी नोकरीत त्रास संभवतो, त्यामुळे आपले काम चोख करा
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो कोर्टकचेऱ्या चालू असतील, तर त्या संबंधातील कामे रेंगाळतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या आजारांना उधाण येईल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो काही वेळेस समस्या या अनेकदा संधी असू शकतात, हे जाणून घ्या, त्याचा फायदा घ्या..
हेही वाचा>>
Gudi Padwa 2025 Rajyog: गुढीपाडव्याला बनतोय जबरदस्त राजयोग! 'या' 6 राशींचा 'गोल्डन टाईम' सुरू होतोय, राजासारखं जीवन जगणार, बक्कळ पैसा, नोकरीत यश..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)