Horoscope Today 23 April 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्यावर जी काही जबाबदारी आली आहे, ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. मेष ते मीन राशींसाठी रविवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे व्यवसाय करत आहेत ते आपल्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करताना दिसतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. आज कुटुंबातील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पूर्ण कराव्यात. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावीत. पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. मोठ्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेमळ क्षण घालवताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या घरच्या कामात खूप व्यस्त असाल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमच्यावर जी काही जबाबदारी आली आहे, ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा. व्यवसायात प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्हाला नवीन लोकांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे तुम्ही नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामात आज तुम्हाला यश मिळेल. मित्रांच्या सहकार्याने लाभाची स्थिती निर्माण होईल. संध्याकाळी मुलांसोबत चांगला वेळ जाईल, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांना खूप फायदा होणार आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना देखील कराल, जो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत भागीदारी करून कराल. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. चांगल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. तुम्हाला तुमच्या मुलाकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाचा अभिमान वाटेल. घरोघरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करू लागतील. नवीन पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण राहील. जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तज्ञाचा सल्ला घ्या. घरापासून दूर काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या घराची आठवण येईल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांसाठी आजऑफिसमधील कामाच्या बाबतीत तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याचीही चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना विशेष फायदा होणार नाही. आज तुम्हाला प्रेमात निराशा येईल. भविष्याची चिंता तुम्हाला त्रास देऊ शकते, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यातही यश मिळेल. पालकांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. राजकारणात यश मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात काही नवीन कामांसाठी प्रेरणा मिळण्याची संधी मिळेल. आज एखाद्या गोष्टीबद्दल मनात द्विधा मनस्थिती निर्माण होईल. आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. कार्यालयात लाभाची स्थिती राहील. स्पर्धेमुळे विद्यार्थी निराश होऊ शकतात, त्यामुळे मेहनत करा, तरच यश मिळेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. अधिक समस्या असल्यास चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतील, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही केलेल्या कामामुळे तुमच्या सन्मानात वाढ होईल. प्रवासाला जाण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे, जो तुमच्यासाठी आनंददायी प्रवास असेल. दूरच्या नातेवाईकाकडून शुभ माहिती मिळेल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत बढतीबरोबरच उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून बोलतांना दिसतील, जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा राखावा लागेल. मोठ्या अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. जे लोक नोकरी करत आहेत त्यांना नोकरीचे काही टेन्शन असू शकते. आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. बँकिंग आणि आयटी नोकऱ्यांशी संबंधित लोकांच्या पदोन्नतीवर चर्चा होईल. तब्येतीत सतत होणारे चढ-उतार तुम्हाला त्रास देतील. व्यवसाय किंवा नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही वेळेवर परत करा. तुम्हाला नवीन वाहनाचा आनंद मिळेल, तुमच्या मनाची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. विद्यार्थी करिअरबाबत उत्साही राहतील. प्रेमातून विश्वास उडाला तर तो पुन्हा जोडला जात नाही, त्यामुळे नात्यात विश्वास ठेवा, तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका. राजकारणात यश मिळेल. घर, दुकान खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. जे घरून ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. नोकरीत बढतीची संधी मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. भावाच्या लग्नात येणाऱ्या अडचणी पुष्कळ उपासनेनंतर संपतील. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. तुम्हाला तुमचा आवडता जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवून तुमची आर्थिक स्थिती मजबूत कराल. व्यवसाय करणारे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आजचा दिवस तुमचा उत्साह वाढवणारा आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल, तुम्हाला नोकरीत यश मिळेल. जे काही काम हातात घ्याल ते वेळेत पूर्ण कराल. आज आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. व्यवसायात इतरांवर विश्वास ठेवू नका, अन्यथा ते तुमची फसवणूक करू शकतात. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या आवडत्या कामांसाठी काढा, जे केल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल. वरिष्ठ सदस्यांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल, जे तुम्ही पूर्ण केले पाहिजे, अन्यथा ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात कोणतीही नवीन योजना अंमलात आणतील, जेणेकरून व्यवसाय पुढे जाऊ शकेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज नशिबाने साथ दिल्याने तुमची कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरीत बदली होण्याची शक्यता राहील. मन अशांत राहील. अध्यात्मात मन लावा, शांती मिळेल. आज तुम्हाला नवीन लोक देखील भेटतील, ज्यांच्याकडून तुम्हाला वाढत्या उत्पन्नाचे स्रोत मिळतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जर तुम्ही प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ नाही. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. घरात पूजा, पाठ आयोजित केले जातील, तिथे सर्व लोकांची ये-जा असेल.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणारे सर्व अडथळे आज दूर होतील. शिक्षकांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आज तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्यात सुधारणा दिसेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल. आजच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडीचे काम करा. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा फायदा तुम्हाला मिळेल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :