Horoscope Today 22 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 22 सप्टेंबर 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज समोरच्या व्यक्तीचे अंतरंग जाणून घेण्याची खास कला तुम्हाला अवगत होईल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या अचूक अंदाजाचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होईल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्या .
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज घरात आनंदी आणि उत्साही वातावरण लावेल, चैनीच्या गोष्टींची खरेदी करण्याकडे कल राहील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज स्त्रियांचा जबाबदारी टाळण्याकडे कल राहील, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनातील प्रचंड संघर्षाची खळबळ समोर पाहणाऱ्याला जाणवणार आहे, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आज तुमच्या आसपास वापरायला लोक घाबरतील, कामाच्या ठिकाणी प्रचंड धाडस दाखवाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज प्रचंड आत्मविश्वासाने समोरच्या माणसाला आपलेसे करून घ्याल प्रगतीचा वेग वाढेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज धंद्यात जादा भांडवलाची गरज भासेल, पूर्वी घेतलेले कष्ट आता उपयोगी पडतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज प्रदेशात ज्यांचे व्यवहार चालतात, अशा लोकांना आर्थिक फायदा मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज ज्यांचा जोडधंदा आहे, त्यांनी आर्थिक बाजू भक्कम होण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्यांचा बोलण्याचा व्यवसाय आहे. त्यांना फायदा होईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो मॅनेजमेंटच्या व्यवसायात असणाऱ्यांनी कामाचे उत्तम नियोजन करण्यावर भर द्यावा
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढच्या 7 दिवसांत जबरदस्त धनलक्ष्मी योग बनतोय, नवरात्रीच्या सुरूवातीलाच ‘या’ 5 राशींचे श्रीमंतीचे योग, देवीची कृपा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)