Horoscope Today 22 January 2025 : पंचांगानुसार, आज 22 जानेवारी 2025, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी पडेल. कामाच्या ठिकाणी सलोख्याचे संबंध ठेवा.
वृषभ (Taurus Horoscope Today)
नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे गोंधळात पडल्यासारखे वाटेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
आज बऱ्याच वेळेला बडबड जास्त आणि काम कमी असल्यामुळे स्वतःच्या प्रगतीला खीळ घालाल.
कर्क (Cancer Horoscope Today)
प्रेमवीरांना आपल्या भावना व्यक्त करायला योग्य जोडीदार भेटल्यामुळे उत्साह संचारेल.
सिंह (Leo Horoscope Today)
आज वेगळ्याच स्वप्नांच्या वातावरणात वावराल. पराक्रम आणि प्रतिष्ठा वाढेल.
कन्या (Virgo Horoscope Today)
लोकांच्या नजरेत तुम्ही उंचावलेले असाल. कलेला संधीची दारे उघडी झाल्यामुळे उत्साह राहील.
तूळ (Libra Horoscope Today)
व्यवसाय-नोकरीत दुसऱ्यांवर दया दाखवाल. आर्थिक फायदा मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतील.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज सूचक स्वप्न पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पनांचे मात्र स्वागत होणार नाही, त्यामुळे विचारात पडाल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
लोकांनी तुमच्या गुणवत्तेचे कौतुक केले तरी फार हुरळून जाऊ नका.
मकर (Capricorn Horoscope Today)
जोडीदाराशी मतभेद होणार आहेत. तुम्हाला नवीन नसलं तरी या वेळेस जरा जास्तच ताणून धराल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आज सारासार विचार करून वागणूक ठेवलीत तर दिवस सुखावह जाईल.
मीन (Pisces Horoscope Today)
साहित्य आणि वाङ्मयावर प्रेम करणारे आपल्या कल्पनाशक्तीचा विकास करतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: