Horoscope Today 22 January 2023 : आज रविवार दिनांक 22 जानेवारी 2023. आजचा दिवस वृषभ मिथुन आणि कन्या राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. इतरही राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज तुमच्या राशीबाबत नेमकं काय भाकित केलं आहे? याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत. जाणून घेऊयात सविस्तर आजचं राशीभविष्य...



मेष


मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. जे लोक नोकरी करत आहेतस त्यांच्यासाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात सुरू असलेल्या नुकसानीमुळे हैराण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाने उद्या काही नवीन काम करण्याचा विचार करू शकाल.


वृषभ


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. इच्छित लाभ मिळाल्यानंतर तुम्ही खूप आनंदी दिसाल. तुम्हाला संपत्तीचे अनेक मार्ग सापडतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवू शकाल.नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. लोकांना आकर्षित करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. जे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांच्या सन्मानात वाढ होईल.


मिथुन


मिथुन राशींच्या लोकांसाठी आजचा दवस आनंदी आहे. जे लोक बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत, ते आज प्रगती करू शकतात. त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अध्यात्माकडे वाटचाल करू शकाल. व्यवसाय वाढवण्यासाठी काही योजना पुन्हा सुरू कराल ज्यामध्ये त्यांना यश मिळेल.
राजकारणातील लोकांना उद्या सभांना संबोधित करण्याची संधी मिळणार आहे


कर्क


व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात ते काही नवीन योजना सुरु करु शकतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी नवीन संधी मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्याकडून कोणी पैसे घेतले असतील तर तेही आज तुम्हाला परत केले जातील. ता.



सिंह


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदी असेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही योजना पुढे ढकलू नका, नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश येईल.


कन्या


नोकरदार लोकांची आज प्रगती पाहायला मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी होतील. व्यवसाय करणारे लोक आज अपेक्षित नफा मिळाल्यावर आनंदी दिसतील. तुम्ही तुमच्या दैनंदिनीमध्ये योग आणि ध्यान यांचा समावेश कराल, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुम्ही नोकरीसोबत काही व्यवसाय करण्याचा विचार कराल, ज्यामध्ये तुम्हा पूर्ण सहकार्य करेल.


तूळ


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा  चांगला जाणार आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. आज नवीन सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल, तुमच्या बोलण्याने सर्वांना खूप आनंद होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.


वृश्चिक


व्यवसायात सुरू असलेले चढ-उतार तुम्हाला त्रास देतील. मित्रांच्या मदतीने आज तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेऊ शकाल. बदलत्या हवामानामुळे आरोग्यात चढ-उतार असतील. कुटुंबात काही कारणाने तणाव निर्माण होईल. ज्यामुळं तुम्हाला त्रास होईल. कुटुंबात नवीन अतिथीचे आगमन होईल, त्यामुळे आनंदी वातावरण राहील. 


धनु


धनु राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. सर्व क्षेत्रातून काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्या तुमच्या ओळखीच्या व्यक्तींशी बोलून उद्या तुम्हाला खूप बरे वाटेल. तुम्हाला काही चांगली बातमीही ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळेल. प्रत्येकजण तुमच्याकडे आकर्षित होईल.


मकर


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. राजकारणात प्रगती होईल. करिअर करण्यासाठी वेळ खूप चांगला आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक आनंदी दिसतील. तुम्ही तुमची प्रतिष्ठा सर्वत्र पसरवू शकाल.


कुंभ


नोकरदार लोक आज कामाच्या जास्त ताणामुळे अस्वस्थ दिसतील. व्यवसायात नवीन कामे सुरू होतील, ज्यामुळे व्यवसाय पुढे जाईल. नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय भाग घ्याल. काही पैसे देखील खर्च कराल. एखाद्याच्या लग्नात येणारे अडथळे नातेवाईकांच्या मदतीने दूर होतील. 


मीन


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. जे लोक मॅनेजमेंटच्या नोकरीत आहेत, त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. बँकिंग आणि आयटी नोकरदारांना फायदा होईल.  
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)