Horoscope Today 21 November 2024 : पंचांगानुसार, आज 21 नोव्हेंबर 2024, गुरुवारचा दिवस. आज गुरु पुष्य योग आहे. हा योग जवळपास काही राशींसाठी शुभ असणार आहे. तर काही राशींना चांगलाच तोटा होणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज कोणत्याही कामासाठी लागणारे धाडस तुमच्यामध्ये पुरेपूर असणार आहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
मद्याची साथ मिळाल्यामुळे इकडची दुनिया तिकडे करण्याची ताकद मिळेल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींमुळे तापटपणा वाढेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज पित्त विकार बळवण्याची शक्यता रक्तदावाचा त्रास असणाऱ्यांनी औषधे टाळू नयेत
सिंह रास (Leo Horoscope Today)
जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल. महिला लहरी बनतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
नोकरी व्यवसायात आज कितीही काम केले तरी वरिष्ठांची मर्जी न झाल्यामुळे मानसिक त्रास होईल
तुळ रास (Libra Horoscope Today)
कोणत्याही गुप्त गोष्टी करताना काळजी घ्यावी लागेल महिलांना काही ठोस निर्णय घ्यावे लागतील
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
कोणत्याही सामाजिक घडामोडींचा परिणाम घरावर होऊ न देण्याची काळजी घ्या
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
घरामध्ये मौन पाळलेत तर वातावरण चांगले राहिल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कमिशन एजन्सी चे धंदे करणाऱ्यांना आपल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
गाठीभेटी आणि संपर्क या माध्यमातून कामाची गती वाढेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
भरपूर कष्ट करावे लागले तरी लाभ समोर दिसत असल्यामुळे कष्ट कराल
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: