Guru Pushya Yog 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती वेळोवेळी बदलत असते. याचा शुभ-अशुभ परिणाम प्रत्येक राशींवर होतो. असाच एक योग (Yog) म्हणजे गुरु पुष्य योग. या योगाच्या दरम्यान काही वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच, यामुळे शुभ फळ प्राप्त होते. अशातच 2024 वर्षातला शेवटचा गुरु पुष्य योग नेमका कधी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तसेच, यामुळे कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात. 


द्रिक पंचांगानुसार, पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी सुरु होणार आहे. ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी समाप्त होणार आहे. हा योग गुरुवारी जुळून येतो त्यामुळे याला गुरु पुष्य योग म्हणतात. या व्यतिरिक्त या दिवशी रवि योग दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपासून ते 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांपर्यंत असणार आहे. या व्यतिरिक्त अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योगसुद्धा जुळून येणार आहे जो सकाळी 06 वाजून 49 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत असमार आहे. 


मीन रास (Gemini Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योगाचा काळ फार लाभदायक ठरणार आहे. ज्या लोकांची अनेक दिवसांपासून कामे रखडली आहेत त्यांची या काळात ती कामे पूर्ण होतील. तसेच, उत्पन्नाचे नवे सोर्स तुम्हाला मिळतील. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त झुकलेला असेल. तसेच, या दिवशी तुम्ही धार्मिक कार्यातही सहभागी होऊ शकतात. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक असणार आहे. तुम्हाला करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्यात बौद्धिक क्षमता, आत्मविश्वास वाढलेला दिसेल. सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुम्हाला परदेशात फिरायला जाण्याची संधी देखील मिळू शकते. तसेच, तुम्ही नव्याने तुमचा व्यवसाय सुरु करु शकता. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग फार लाभदाक असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला तुमच्या नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात अचानक धनलाभाचे योग जुळून आले आहेत. या काळात तुम्हाला आई-वडिलांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठी असणार आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :                                              


Astrology : आज गौरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; 'या' 5 राशींसाठी सुरु होणार सुवर्णकाळ, लवकरच स्वप्न होतील साकार