Horoscope Today 21 April 2024 : पंचांगानुसार, आज 21 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. चैत्र महिन्याचा तेरावा दिवस अनेकांसाठी शुभ ठरेल, तर या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस कसा राहील? आज तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
21 एप्रिल 2024 राशीभविष्य (Horoscope Today 21 April 2024)
मेष रास (Aries Horoscope Today)
आज तुम्हाला चांगली संधी मिळून सुद्धा त्या संधीचं सोनं करण्यासाठी लागणारी ग्रहांची साथ थोडी कमी मिळणार आहे. अडथळ्याची शर्यत होऊन कामं विलंबाने पार पडतील.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
परिस्थितीशी झगडण्यात मोठी शक्ती खर्च करावी लागेल. राजकारणामध्ये पुढे येण्याची संधी मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
धंद्यामध्ये भागीदाराचं उत्तम सहकार्य मिळेल. आज थोडं स्पष्टवक्ते बनाल. महिला स्वतःच्या मनाप्रमाणे इतरांना वागायला लावतील.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
आज योग्य ते सडेतोड बोलणं तुम्ही जास्त पसंत कराल. तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारची तडफ असेल.
सिंह (Leo Horoscope Today)
महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याचा मोह तुम्ही टाळू शकणार नाही. महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे.
कन्या (Virgo Horoscope Today)
जबाबदारीचा वसा हाती घेऊन ती पार पाडण्यासाठी सर्वस्व पणाला लावा. तुमचा आत्मविश्वास इतरांना आश्चर्यचकित करेल.
तूळ (Libra Horoscope Today)
तुमच्या कामातील पारदर्शीपणा तुम्हाला फायद्याकडे घेऊन जाणार आहे. शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
स्थावर इस्टेटिसंबंधीचे कोणतेही निर्णय घेऊ नयेत. कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
कोणतंही काम तडीला जाण्यासाठी वेळ लागेल. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नयेत. महिला जरा लहरी बनतील
मकर (Capricorn Horoscope Today)
प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम चोख ठेवण्याकडे कल ठेवा. कोर्टकचेरीची कामं लांबतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
शेजाऱ्यांशी अतिसलगी किंवा वाद टाळावेत. भावंडांशी मतभेद संभवतात. घशाचे विकार होण्याचा संभव आहे.
मीन (Pisces Horoscope Today)
प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवासामध्ये सर्व प्रकारची काळजी घेणं आवश्यक ठरेल. महिलांनी कोणत्याही कामात अति धाडसीपणा टाळावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :