Beed News : बीड जिल्हा परिषदेच्या (Beed Zilla Parishad) प्राथमिक आणि माध्यमिक विभागात गेल्या काही वर्षात शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. मात्र या शिक्षक भरतीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या होत्या. याबरोबरच थकीत वेतन घोटाळा या सगळ्या प्रकरणात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी गैरकारभार केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. यानंतर या दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे.

Continues below advertisement

दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत मंत्रलयीन स्तरावर तक्रारी केल्या होत्या. यानंतर शासनस्तरावर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. आता याच तक्रारींची दखल घेत शासनाने माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी या दोघांना निलंबित केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन झालेल्या या कारवाईने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक भरती आणि थकीत वेतन घोटाळा अधिकाऱ्यांना चांगलाच भोवला आहे. तक्रारीनंतर अखेर त्यांचे निलंबन केले आहे. 

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार

जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षण भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सादिक इनामदार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडं तक्रार केली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सादिक इनामदार यांनी केली आहे. नागपूरमध्ये शिक्षक भरती प्रकरणी चौकशी सुरू आहे. यासोबत बीड जिल्ह्यातही शिक्षक भरतीमध्ये खासगी संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझ्या जीवाला धोका आहे. मला काही बरे वाईट झाल्यास जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी भगवान फुलारी आणि ज्या खासगी संस्थेत भ्रष्टाचार झाला. हे या घटनेस जबाबदार राहतील असं देखील सादिक इनामदार यांनी म्हटलं होतं. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट